निवडणुकीत भाजपला मुळासकट उपटून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:07 AM2019-02-25T01:07:25+5:302019-02-25T01:07:30+5:30

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. ...

Put the BJP uprooted in the elections | निवडणुकीत भाजपला मुळासकट उपटून टाका

निवडणुकीत भाजपला मुळासकट उपटून टाका

Next



म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. गगनबावडा) येथे जनआक्रोश मेळावा झाला. यावेळी हजारो शेतकºयांनी घोषणाबाजी आणि मनोगताद्वारे सरकारचा निषेध करून आपल्या एकीची वज्रमूठ कायम राखण्याची शपथ घेऊन आगामी निवडणुकांवर बहिष्काराचा ठाम निर्धार व्यक्त केला.
धामणी खोरे विकास कृती समितीच्या माध्यमातून हा जनआक्रोश मेळावा झाला. या मेळाव्यात हजारोंच्या समुदायाने प्रचंड घोषणाबाजी केली. येथील गावागावांतील निवडणुकांवर बहिष्काराचे ठराव धामणी विकास कृती समिती व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले असून, हजारो शेतकºयांच्या स्वाक्षºयांचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्यासह जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.
पाणी पाणी म्हणत अनेक पिढ्या संपल्या; पण पाणी काही आलेच नाही. रखरखलेले जीवन आणि खुरटलेले संसार घेऊन जगणाºया धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान आमच्या पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्घार होईल का? मायबाप सरकारचं इतके निष्ठूर का झाले असावे, अशा
अनेक प्रश्नांची सरबत्ती करत शासनाप्रती धुंदवडे येथे जनतेने आक्रोश केला. यावेळी परिसरातील हजारो नागरिकउपस्थित होते.
तब्बल १८ वर्षे धामणी प्रकल्प रखडल्याने येथील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाच्या प्रचंड बेफिकिरीमुळे या खोºयातील शेतकºयांना पाणी पाणी करावे लागत आहे. पावसाळयात अतिवृष्टी, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना अशा दुहेरी संकटात या खोºयातील शेतकरी सापडला असून, शेती व्यवसाय आतबट्टयाचा झाला आहे.
सन २००० मध्ये ३.८५ टीएमसी साठवण क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. दोन तीन वर्षे चाललेले काम वगळता आजवर हा प्रकल्प रखडलेलाच आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा निघाली नसल्याने प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. अनेकदा आंदोलने करूनही येथील लोकांच्या न्याय मागणीला शासनाने केराची टोपलीच दाखविली. त्यामुळे ६० गावांतील जनतेने धामणी धरणाचे काम चालू होत नाही, तोपर्यंत पुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.
‘लोकमत’मधील लेखाची चर्चा
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी रविवारच्या अंकात ‘जागर’ या सदरामध्ये लिहिलेल्या ‘निवडणुकांवर बहिष्कार हा पर्याय आहे का?’ या लेखाची चर्चा धुंदवडे येथे मेळाव्यात सुरू होती. अनेकांनी या लेखाचे कौतुक केले. वक्त्यांनी आपल्या भाषणात हा लेख अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. धामणीवासीयांच्या पाठीशी नेहमी राहिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: Put the BJP uprooted in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.