वरणगे हल्लाप्रकरणी पुतण्यासही पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:25+5:302021-06-09T04:31:25+5:30
कोल्हापूर : सामाईक जागेच्या वादातून वरणगे (ता. करवीर) येथे दोन सख्ख्या भावानी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला ...
कोल्हापूर : सामाईक जागेच्या वादातून वरणगे (ता. करवीर) येथे दोन सख्ख्या भावानी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला होता. त्यामध्ये भगवान बुचडे यांचा खून झाला. हल्लाप्रकरणी विरोधी गटातील अटक केलेल्या संदीप भगवान बुचडे (वय २९, रा. वरणगे, ता. करवीर) याला न्यायालयाने सोमवारी दि. १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, खूनप्रकरणी अटक केलेले मयताचे भाऊ भैरवनाथ बुचडे यांनाही दोन दिवसांपूर्वीच दि. १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी हा दोन कुटुंबात सशस्त्र हल्ला झाला होता. याप्रकरणी भगवान बुचडे याचा भोसकून खून केल्याप्रकरणी भैरवनाथ बुचडे याला अटक केली तर त्याचा मुलगा नाना उर्फ विकास भैरवनाथ बुचडे याच्यावरही गुन्हा नोंद आहे, पण तोही गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर भैरवनाथ याच्या तक्रारीनुसार मृत भगवान बुचडे व त्याचा मुलगा संदीप व महेश यांच्यावर गुन्हा नोंद आहे. त्यापैकी महेश हा रुग्णालयात उपचार घेत आहे, तर संदीपला रविवारी पोलिसांनी अटक केली, त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता दि. १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.