नवमतदारांना पीव्हीसी छायाचित्र ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:23+5:302021-01-23T04:23:23+5:30
उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवारी (दि.२५) तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नव्याने नावनोंदणी केलेल्या ...
उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे
कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवारी (दि.२५) तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नव्याने नावनोंदणी केलेल्या युवा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यामार्फत पीव्हीसी मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय कार्यक्रम व्हच्युअल पद्धतीने साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.
--
परिवहन कार्यालयातर्फे मंगळवारी शिबिर
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी शिबिर कार्यालयात अपॉईटमेंट घेण्यासाठी एकसूत्रता यावी यासाठी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कॅम्पसाठी शिबिर व स्लॉट सोडण्यात येणार आहे. संबंधित तालुक्याच्या ठिकाणासाठी मंगळवारी अपॉईंटमेंट घ्यावी व या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
--
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
कोल्हापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशिक्षण कोर्ससाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत ॲटोमोटीव्ह सर्व्हिसेस टेक्निशियन लेवल, सेल्फ एम्लॉयड टेलर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, फिल्ड टेक्निशिएन कॉम्प्युटिंग ॲड पेरीफेरल्सस, ज्युनि. सॉफ्टवेअर डेव्हलपर, ब्युटी थेरपिस्ट, रिटेल ट्रेनी असोशिएट हे कोर्सेस मोफत घेण्यात येणार आहेत.
--
----