शिवाजी विद्यापीठातील गुणवत्ता अभियान; वर्धापनदिनी पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:25 PM2018-11-19T14:25:22+5:302018-11-19T14:25:58+5:30
शिवाजी विद्यापीठातील सभा, विशेष कक्ष, प्रश्नपत्रिका वितरण, परीक्षा देयके, आरोग्य केंद्र, नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभाग प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि गुणवत्ता पुरस्कार योजनेमध्ये अव्वल ठरले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सभा, विशेष कक्ष, प्रश्नपत्रिका वितरण, परीक्षा देयके, आरोग्य केंद्र, नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभाग प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि गुणवत्ता पुरस्कार योजनेमध्ये अव्वल ठरले. या विभागांना विद्यापीठाच्या ५६ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात रविवारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्यावतीने दि. २४ सप्टेंबर ते दि. ३ आॅक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. त्यामधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील विजेते विभाग (विजेत्यांची नावे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी) : कुलसचिव- सभा विभाग, विद्यार्थी विकास विभाग. प्र-कुलगुरू- विशेष कक्ष, संलग्नता टी-२. परीक्षा व मूल्यमापन मंडळ- प्रश्नपत्रिका वितरण, मध्यवर्ती मूल्यमापन विभाग. वित्त व लेखाधिकारी- परीक्षा देयके विभाग, कॅश बुक विभाग. सपोर्ट सर्व्हीसेस- आरोग्य केंद्र, ज्ञानस्त्रोत केंद्र, मुलांचे वसतिगृह, युसिक. पदव्युत्तर अधिविभाग- नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र अधिविभाग. या विभागांना रविवारी वर्धापनदिनाच्या कार्यक्रम जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या गुणवंत पाल्यांचा सत्कार
या कार्यक्रमात मेघना बांदिवडेकर, उल्का चरापले, स्वप्निल बंडगर, मंगेश देसाई, रचना घावरे, स्वरदा भूतकर, भक्ती पाटील, आरती शिंदे, ईश्वरी कुंडले, ऋतुजा खोत, अनुप पाटील, विपुल लोखंडे, विशाल वालकोळी, वैभवी मोहाडीकर, शुभम कदम, अक्षदा पाटील, अदिती शेळके, सोम देवरूखकर, संस्कार चव्हाण, सोमनाथ तोरसे, अरूणा लोंढे, आदित्य परीट, सानिका पोवार, गौरी शेळके, प्रियंका दौंड, वेदांत बिजले, स्वरूपा बिलावर, सिद्धराज माने, नयन हंकारे, निरंजन खामकर, संहिता हेगडे, ऋतिका वंगार, ईश्वरी खामकर, तेजस्विनी कोळेकर, आदित्य सावळकर, मितेश कुंटे या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात आला. विश्ष प्राविण्य मिळविलेल्या डॉ. सुनिल बिर्जे, डॉ. राजेंद्र खामकर, नंदकुमार झांजगे या सेवकांचा सत्कार झाला.