उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणीचे केंद्र कोल्हापुरात होऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:45 AM2021-02-18T04:45:10+5:302021-02-18T04:45:10+5:30
कोल्हापुरातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे येथील इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ‘संरक्षण क्षेत्रात उद्योगांना संधी’ या विषयावर ...
कोल्हापुरातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे येथील इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ‘संरक्षण क्षेत्रात उद्योगांना संधी’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. केवळ रणगाडे, विमानांची निर्मिती म्हणजे संरक्षण क्षेत्रातील उत्पादने नव्हेत. सॅटेलाईट, ड्रोन, वाहने, रबर मेकिंग, संगणकप्रणाली, प्लास्टिक, फूड इंडस्ट्रीज, इंजिनिअरिंग, मशीन टूल्स, आदींबाबतची उत्पादने संरक्षण क्षेत्राला लागतात. त्यामुळे मानसिकता बदलून, कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन या क्षेत्रांतील उत्पादन निर्मितीचे पाऊल उद्योजकांनी टाकावे. नवनिर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन अजित भोसले यांनी केले. उपस्थित उद्योजकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, नरेंद्र माटे, बाबुभाई हुदली, जीवन शिरगावकर, एम. वाय. पाटील, आदी उपस्थित होते. इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल यांनी स्वागत केले. मीलन नाईक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रशांत मोरे यांनी आभार मानले.
चौकट
२५०० कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट
सध्या संरक्षण क्षेत्रातील देशाअंतर्गत उत्पादन हे ७० हजार कोटींचे आहे. पुढील पाच वर्षांत हे उत्पादन एक लाख ७५ हजार कोटींपर्यंत नेण्याचे, तर २५०० कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट सरकारने निर्धारित केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून उत्पादने तयार करून घेण्याची सरकारची योजना असल्याचे अजित भोसले यांनी सांगितले. कोल्हापुरातील वारणा संघाची दूध पावडर सैन्यदलात जाते. त्याप्रमाणे संरक्षण क्षेत्राची मागणी लक्षात घेऊन स्थानिक उद्योजकांना उत्पादनांची निर्मिती करता येईल, असे त्यांनी सांगितले.
फोटो (१७०२२०२१-कोल-अजित भोसले (चर्चासत्र) : कोल्हापुरात बुधवारी एअर मार्शल अजित भोसले यांनी संरक्षण क्षेत्रातील संधीबाबत उद्योजकांना मार्गदर्शन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)