पद्मा पथक उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: April 21, 2017 12:25 AM2017-04-21T00:25:56+5:302017-04-21T00:25:56+5:30

सतेज चषक हॉकी : इस्लामपूरच्या सुभद्रा डांगे, एस. डी. पाटील संघांचीही आगेकूच

In the quarter-finals of the Padma Pathak | पद्मा पथक उपांत्यपूर्व फेरीत

पद्मा पथक उपांत्यपूर्व फेरीत

Next

कोल्हापूर : लाईन बझार येथे सुरू असलेल्या आमदार सतेज पाटील हॉकी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी इस्लामपूरच्या सुभद्रा डांगे संघ, एस. डी. पाटील ट्रस्ट, पद्मा पथक संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
लाईन बझार मैदानावर गुरुवारी सकाळी पहिला सामना झाला. यात इस्लामपूरच्या सुभद्रा डांगे संघाने मराठा वॉरियर्स संघाचा ४-२ असा पराभव केला. यात ‘सुभद्रा’कडून संतोष बिरजे व रोहित खोत यांनी अनुक्रमे ११ व्या व १७ व्या मिनिटास गोल करीत आपल्या संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला मराठा वॉरियर्सकडून प्रसाद नाईकने शॉर्ट कॉर्नरवर गोल करीत ही आघाडी २-१ ने कमी केली.
सामन्याच्या उत्तरार्धात ‘सुभद्रा’कडून दिग्विजय कलशे याने ३० व्या व ३८ व्या मिनिटास गोल करीत ही आघाडी ४-१ अशी भक्कम केली. सामन्याच्या ४८ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर प्रसाद नाईकने गोल करीत सामन्यात ४-२ अशी आघाडी कमी केली. संपूर्ण वेळेत हीच गोलसंख्या राहिल्याने हा सामना सुभद्रा डांगे संघाने जिंकला.
दुपारच्या सत्रात पहिल्या सामन्यात एस. डी. पाटील ट्रस्टने हॉकी लव्हर्स गु्रपचा २-१ असा पराभव केला. यात पाटील ट्रस्टकडून महेश घाटगे व अल्लाउद्दीन शेख यांनी गोल करीत
२-० अशी आघाडी घेतली; तर लव्हर्स गु्रपकडून संग्राम पोकळे याने गोल नोंदवित ही आघाडी २-१ ने कमी केली. संपूर्ण वेळेत सामन्यात बरोबरी साधता न आल्याने पाटील ट्रस्टने हा सामना जिंकला. दुसरा सामना पद्मा पथक व वासू बेल्लारी (हुबळी) संघ यांच्यात होणार होता. मात्र, वासू बेल्लारी संघ वेळेत मैदानात उपस्थित न राहिल्याने पद्मा पथक संघास पुुढे चाल देण्यात आली. त्यामुळे तिन्ही विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले.


लाईन बझार येथे सुरू असलेल्या आमदार सतेज पाटील हॉकी स्पर्धेत गुरुवारी सुभद्रा डांगे संघ व मराठा वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.

Web Title: In the quarter-finals of the Padma Pathak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.