१५ वर्षांचा प्रश्न मार्गी मालवे-बोरवडे रस्त्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:21+5:302021-06-04T04:19:21+5:30
सरवडे : मालवे-बोरवडे या रस्त्याचे काम रुंदीकरणास पूर्ण झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. दोन तालुक्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या या ...
सरवडे : मालवे-बोरवडे या रस्त्याचे काम रुंदीकरणास पूर्ण झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
दोन तालुक्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या या रस्त्यासाठी गेली १५ वर्षे निधीअभावी दुर्लक्षित होता. अतिशय खराब रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवासी वर्गाची मोठी कुचंबणा होत होती. जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी या रस्त्याच्या कामासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्याने मुश्रीफ यांनी भरघोस भरघोस निधी उपलब्ध करून दिला.
शासनाच्या ३०/५४ या योजनेतून पहिल्यांदा ८० लाख नंतर २५ लाख निधी उपलब्ध केला. पावणेचार मीटर असलेला हा रस्ता सध्या पाच मीटरने रुंदीकरणासह डांबरीकरण तसेच तुटलेल्या ओढ्याला संरक्षण भिंत व मशिनच्या साहाय्याने कारपेट असे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान
गेले अनेक वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते. ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी रहदारीसाठी असलेले. महत्त्व लक्षात घेऊन भरघोस निधी उपलब्ध केला. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांची कुंचबणा दूर झाली त्याचे समाधान आहे.
मनोज फराकटे
सदस्य, जि. प. कोल्हापूर