बाहुबलीत यजमानपदांचे सवाल, पायाडपूजन; वेबसाईटचे उद्घाटन
By admin | Published: December 26, 2014 09:44 PM2014-12-26T21:44:13+5:302014-12-26T23:56:58+5:30
सवाल बोलीमध्ये भाविकांची संख्या लक्षणीय होती.
बाहुबली : येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेकानिमित्त विविध यजमानपदांचे सवाल संपन्न झाले. सवाल बोलीमध्ये भाविकांची संख्या लक्षणीय होती. तत्पूर्वी सकाळी महामूर्तीशेजारी पायाडाचे पूजन महामस्तकाभिषेक समितीचे सहकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या दोन्ही समारंभास १०८ श्रीभद्र महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज व आर्यिका ज्ञानमती माताजी उपस्थित होते. ३० जानेवारी ते ५ फेबु्रवारी २०१५ दरम्यान बाहुबली येथे होणाऱ्या महामस्तकाभिषेकानिमित्त विविध विधान व कलशाभिषेकाचे आयोजन केले आहे. त्याप्रमाणे पूजा-विधानांचे मानकरी ठरविण्याचे सवाल संपन्न झाले. क्षुल्लक समर्पणसागर महाराजांनी उपस्थितांना दान करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात भगवान बाहुबली मूर्तीशेजारी पायाडाचे पूजन करून महामस्तकाभिषेकाच्या प्रथम चरणास सुरुवात करण्यात आली. या समारंभाचे औचित्य साधून बाहुबली विद्यापीठाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सनतकुमार आरवाडे, डी. सी. पाटील व प्रकाश आवाडे यांनी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना महामस्तकाभिषेक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी बी. टी. बेडगे, बापूसाहेब पाटील, आप्पासाहेब भगाटे, जिनरत्न रोटे, रायचंद्र हेरवाडे, श्रीधर हेरवाडे, आदी उपस्थित होते.