शिरोळ हद्दवाढ मोजणीचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:37+5:302021-03-28T04:22:37+5:30

संदीप बावचे शिरोळ : गेली २० वर्षे प्रलंबित असलेला शिरोळ येथील हद्दवाढ आणि मिळकत मोजणीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार ...

The question of calculating the peak boundary will be solved | शिरोळ हद्दवाढ मोजणीचा प्रश्न मार्गी लागणार

शिरोळ हद्दवाढ मोजणीचा प्रश्न मार्गी लागणार

Next

संदीप बावचे

शिरोळ

: गेली २० वर्षे प्रलंबित असलेला शिरोळ येथील हद्दवाढ आणि मिळकत मोजणीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. हद्दवाढ मोजणीकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर झाला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे तो प्रलंबित होता. अखेर मोजणीसाठी १ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महिनाभरात मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर शासकीय पातळीवरील सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर ३५९१ मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.

शहरातील वाढीव उपनगरातील दुहेरी कर प्रश्नासंदर्भात अनेक वेळा आंदोलने झाली. केवळ आश्वासने मिळाली होती. उपनगरांतर्गत जवळपास ३५०० हून अधिक कुटुंबांना चावडीमधील शेतसारा व नगरपालिकेचा घरफाळा असा दुहेरी कर भरावा लागत आहे. गावठाण हद्दवाढ मंजूर असतानाही संबंधित प्लॉटधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळू शकत नाही.

भौगोलिक क्षेत्र, नकाशे उपलब्ध नसल्याने ही वेळ मिळकतधारकांवर आली होती. नगरपालिकेच्या वाढीव गावठाण क्षेत्रातील मिळकतीच्या मोजणीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिरोळ हद्दवाढीचा प्रश्न लावून धरला होता. सप्टेंबर २०२० मध्ये हद्दवाढ मोजणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीला मंजुरी मिळाली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हद्दवाढीच्या मोजणीसाठी लागणाऱ्या १ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली नव्हती. दोन दिवसांपूर्वी निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पुणे जमाबंदी आयुक्तांच्या परवानगीनंतर भूमापन कार्यालयाकडून लवकरच मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ड्रोनद्वारे माेजणी २००६ साली निधी व तांत्रिक अडचणीमुळे हद्दवाढीचा प्रश्न लटकला होता. त्यानंतर गेली पंधरा वर्षे त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती. ड्रोनद्वारे मोजणीची प्रक्रिया होणार असल्याने अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कोट -

महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासनपूर्ती झाली आहे. ३५९१ मिळकत धारकांना मोजणीनंतर कायमस्वरूपी प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत. मोजणी प्रक्रियेनंतर घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

-तातोबा पाटील, नगरसेवक, शिरोळ नगरपालिका

Web Title: The question of calculating the peak boundary will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.