घरफाळा, पाणी बिले भरण्यासाठी सुविधा केंद्रावर रांगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:28+5:302021-06-09T04:28:28+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोमवारी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर दाखले काढण्यासाठी तसेच घरफाळा, पाण्याची बिले भरण्यासाठी नागरिकांनी ...
कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोमवारी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर दाखले काढण्यासाठी तसेच घरफाळा, पाण्याची बिले भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या. विशेष: वरुणतीर्थ गांधी मैदान येथील नागरी सुविधा केंद्रावर मोठी गर्दी झाली.
गेले दीड महिना लॉकडाऊनचे कडक निर्बंध होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. त्यानंतर सर्व व्यवहार बंद ठेवले जात असल्याने अनेकांची अनेक प्रकारची कामे खोलंबलेली आहेत. सोमवारी निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसायांना परवानगी दिल्यामुळे सोमवारी सर्वत्र गर्दी उसळली होती.
महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्रेही अपवाद राहिली नाहीत. वरुणतिर्थवेश गांधी मैदान, शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्रावर गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. कोणाला मृत्यूचे दाखले, कोणाला जन्माचे दाखले पाहिजे होते. याशिवाय अन्य दाखले, असेसमेंट उतारे नेण्यासाठी नागरिक केंद्रावर गेले होते. महापालिका प्रशासनाने घरफाळा बिलात सहा टक्क्याची सवलत जाहीर केली आहे, त्यामुळे काही जण घरफाळा भरण्यासही केंद्रावर गेले होते.
लोकांना मनस्ताप..
एकाच दिवशी मोठ्या संख्येने नागरीक नागरी सुविधा केंद्रावर आल्याने सर्व्हर डाऊन झाला, नेट कनेक्शन नीट मिळत नव्हते. त्यामुळे तेथील संगणकीय यंत्रणा धीम्या गतीने काम करत होती. त्याचा लोकांना मनस्ताप झाला. नागरिकांची केंद्रावरील रांग वाढण्यात तसेच अधिक वेळ थांबून राहण्यात झाला.
(फोटो पाठवला आहे)