पेट्रोल भरण्यासाठी रांगाच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:19+5:302021-07-25T04:21:19+5:30

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे. ...

Queues to fill up with petrol | पेट्रोल भरण्यासाठी रांगाच रांगा

पेट्रोल भरण्यासाठी रांगाच रांगा

Next

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे शहरात इंधनाचे टँकर येऊ शकत नाहीत. संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन वाहनधारकांनी शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

गेले चार दिवस सलगपणे पडणाऱ्या पावसामुळे शहरातील काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात गेले आहेत. त्यात मिरजेहून कोल्हापूरकडे होणारा पेट्रोल-डिझेल पुरवठा शुक्रवारपासून बंद झाला आहे. हा पुरवठा राष्ट्रीय महामार्गावरील पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर सुरू होणार आहे. शहरातील पंपाना पुरवठा करणारे टँकर मिरजेतील पेट्रोलियम कंपन्यांतून इंधन भरून हातकणंगले येथे महामार्गावरील पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तर पूर परिस्थिती बघून किमान आठवडाभर पेट्रोल मिळणार नाही या भीतीपोटी अनेक वाहनधारकांनी शहरातील विविध पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल-डिझेल विक्री करावी. सर्वसामान्य वाहनधारकांना पेट्रोल देऊ नये, असे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा शहरातील अनेक पंपांवर सर्वसामान्यांनाही पेट्रोल-डिझेल दिले जात होते. दुपारनंतर सर्वसामान्य वाहन धारकांना पेट्रोल देण्यास बंद करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर हातकणंगले येथे उभे असलेले टँकर शहरात पोहोचतील अशी व्यवस्था कंपनीने केली आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.

सीएनजीचा तुटवडा

कोल्हापूर जिल्ह्यात रत्नागिरीहून सीएनजी गॅस पुरवठा होतो. साखरपा येथील मुर्शी नदीला पूर आल्यामुळे कोल्हापूरकडे होणारी वाहतूक बंद झाली आहे. उद्यापर्यंत तेथील पुराचे पाणी ओसरले नाही तर जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवू शकतो.

Web Title: Queues to fill up with petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.