नेसरीत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची धावती भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:01+5:302021-06-03T04:18:01+5:30
नेसरी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मार्गदर्शनपर भाषणात बलकवडे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरी लाट थोपविण्यासाठी नियमबाह्य वागणाऱ्या, ...
नेसरी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मार्गदर्शनपर भाषणात बलकवडे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरी लाट थोपविण्यासाठी नियमबाह्य वागणाऱ्या, व्यापारी, नागरिकांवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले. या वेळी गावातील कोरोना रुग्ण, चेक पोस्टबाबत माहिती घेतली. तसेच १५ जूनपर्यंत कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना आखल्याची माहिती दिली. अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या घटकांनी नियम तोडल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे स्पष्ट आदेश यांनी दिले.
या वेळी बलकवडे यांनी चेक पोस्टलाही भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. सरपंच आशीष कुमार साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, अब्दुळराऊप मुजावर, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, सहा. फौजदार शिवाजीराव पाटील, पोलीस पांडुरंग निकम यांच्यासह पोलीस, होमगार्ड व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. नेसरी येथून चंदगडला भेट देऊन तेथून आजराकडे रवाना झाले.