‘आर. डीं.’ना तत्काळ अटक करा

By admin | Published: November 1, 2015 01:21 AM2015-11-01T01:21:23+5:302015-11-01T01:24:27+5:30

हसन मुश्रीफ

'R. D. 'immediately arrest | ‘आर. डीं.’ना तत्काळ अटक करा

‘आर. डीं.’ना तत्काळ अटक करा

Next

कोल्हापूर : आनंदराव चौगले यांना पिस्तुलाचा धाक दाखवून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. या घटनेचा जाहीर निषेध करून संबंधितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘भाजप-ताराराणी’ ही खंडणी वसूल करणारी, गुंडगिरी प्रवृत्तीची असल्याचे आम्ही निवडणुकीच्या सुरुवातीपासून सांगत होतो. त्याचा प्रत्यय शनिवारी जनतेला आला असून, कोल्हापूरच्या सुज्ञ मतदारांनी या आघाडीच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुश्रीफ म्हणाले, आनंदराव चौगले यांना हकनाक मृत्यूला सामोरे जावे लागले. चौगले यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले आर. डी. पाटील यांना आतापर्यंत अटक होणे गरजेचे होते. आर. डी. पाटील यांच्या भीतीमुळेच आत्महत्या केल्याचे चौगले यांनी चिठ्ठीत स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक होणे गरजेचे होते. पालकमंत्री ‘आर. डीं.’ना पाठीशी घालत आहेत, त्याचा निषेध करतो.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, संगीता खाडे उपस्थित होते.
राष्ट्रवादीचाच महापौर
गेला दीड महिना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूर शहरात ठाण मांडले आहे. गल्लोगल्ली जाऊन प्रचार केला. गेले चार-पाच दिवस शहरात राष्ट्रवादीची एक लाट आली आहे. राष्ट्रवादी स्वबळावर महापालिकेवर झेंडा फडकवील व कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: 'R. D. 'immediately arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.