आर. के. नगरमधील नागरिकांचा कोविड सेंटरला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:35+5:302021-05-27T04:24:35+5:30
मात्र, या ठिकाणी मुख्य वस्ती व ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने या कोविड सेंटरमुळे पुन्हा बाधितांची संख्या वाढू शकते, ...
मात्र, या ठिकाणी मुख्य वस्ती व ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने या कोविड सेंटरमुळे पुन्हा बाधितांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त करत येथील नागरिकांनी कोविड सेंटरला विराेध दर्शविला आहे. यासंदर्भात नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनावर प्रा. अरुण भोसले, सूर्यकांत पाटील, यशवंत कोगेकर, समीर आठल्ये, मंगेश पोवार यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत. दरम्यान, मोरेवाडीसह आर. के. नगर येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बरेचजण घरातच उपचार घेत आहेत. त्यामुळे घरातील लोकांना देखील लागण होऊ शकते. त्यासाठी चालू करत असलेल्या कोविड केअर सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेता हे कोविड सेंटर देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल या ठिकाणी चालू करणार असल्याचे आशिष पाटील यांनी सांगितले.