विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी आर. आर. कुंभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:00+5:302020-12-11T04:50:00+5:30

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदाचा कार्यभार डॉ. रमेश राजाराम तथा आर. आर. कुंभार यांनी स्वीकारला आहे. श्री स्वामी ...

R. as the Principal of Vivekananda College. R. Potter | विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी आर. आर. कुंभार

विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी आर. आर. कुंभार

Next

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदाचा कार्यभार डॉ. रमेश राजाराम तथा आर. आर. कुंभार यांनी स्वीकारला आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये ते गेल्या ३४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी संस्थेच्या कऱ्हाड, कडेपूर, सातारा, तासगाव, इचलकरंजी या शाखांमधून काम केले आहे.

डॉ. कुंभार यांचे मूळ गाव हिवरे (ता. खानापूर) आहे. प्राचार्यपदावरील कामाचा त्यांना १५ वर्षांच्या अनुभव आहे. इचलकरंजीतील दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजमधील प्राचार्यपदावरून त्यांची विवेकानंद महाविद्यालयात बदली झाली आहे. शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळे आणि समित्यांवर त्यांनी काम केले आहे. विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी मंगळवारी त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या महाविद्यालय परिसरातील समाधीचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्याग, सेवा व कर्तव्यभावनेने ही संस्था उभी राहिली आहे. त्यांनी निर्माण केलेला ध्येयवाद, कार्याचा वारसा व विवेकानंद कॉलेजची यशाची परंपरा यापुढेही अशीच सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

-डॉ. आर. आर. कुंभार

फोटो (०९१२२०२०-कोल-प्रिन्सिपल कुंभार)

Web Title: R. as the Principal of Vivekananda College. R. Potter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.