जातीवाचक शिवीगाळ; दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:16+5:302021-02-07T04:23:16+5:30

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी, १४ ऑक्टोबर २०१८ रोजी रुकडी (ता. हातकणंगले) गावातील कुंभार तळे येथून प्रथमेश गौतम चव्हाण व ...

Racist abuse; Punish both | जातीवाचक शिवीगाळ; दोघांना शिक्षा

जातीवाचक शिवीगाळ; दोघांना शिक्षा

Next

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी, १४ ऑक्टोबर २०१८ रोजी रुकडी (ता. हातकणंगले) गावातील कुंभार तळे येथून प्रथमेश गौतम चव्हाण व त्याचा कामगार शब्बीर दरवेशी हे दोघेजण जात होते. त्यावेळी मनोज व सौरभ या दोघांनी प्रथमेश याला अडवून जातीवाचक शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील १ हजार रुपये काढून घेतले. याबाबत हातकणंगले पोलिसात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी करून येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यामध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले. शिक्षा सुनावताना फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून व सरकारी वकील एस. आर. सावंत-भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारी वकील यांना हातकणंगले ठाण्याचे अंमलदार संग्राम पंडित-पाटील यांनी सहकार्य केले.

Web Title: Racist abuse; Punish both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.