सराफ संघाच्या सभेत राडा
By admin | Published: July 24, 2014 12:15 AM2014-07-24T00:15:13+5:302014-07-24T00:18:41+5:30
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी.. : अंगावर धावून जाण्याचे प्रकार
कोल्हापूर : इमारतीच्या लिफ्टसाठी झालेला वाढीव खर्च, महालक्ष्मीच्या महाप्रसाद उपक्रमाचा हिशेब, दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात केलेले राजकारण आणि सभासदांना विश्वासात न घेता कामकाज केल्याच्या कारणावरून आज, बुधवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अत्यल्प किमतीत सोनाली ड्रेसेस्ला कायमस्वरूपी जागा भाडेतत्त्वावर दिल्याप्रकरणी माजी अध्यक्षांचेही सभासदत्व रद्द करावे, या मागणीवरून सभासद आणि माजी अध्यक्षांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची द्विवार्षिक सभा आज, बुधवारी महाद्वार रोड येथील संघाच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष रणजित परमार होते. यावेळी उपाध्यक्ष संजय खद्रे, सचिव सुरेश ओसवाल, धर्मपाल जिरगे, कार्यप्रमुख शिवराज पोवार उपस्थित होते.
सभेपुढील विषय मांडतानाच सदस्य माणिक पाटील यांनी गेल्यावर्षीची सभा का घेतली नाही? अशी विचारणा केली. यावर अध्यक्ष परमार यांनी सोनाली ड्रेसेसच्या न्यायालयीन प्रकरणात वेळ गेल्याचे सांगितले. सुरेंद्र पुरवंत यांनी लिफ्टसाठी २० लाख रुपये एवढा अवास्तव खर्च का केला तसेच इमारतीच्या दरवाज्यासाठी ४० हजार रुपये का वापरले? हा प्रश्न उपस्थित केला. यावर परमार यांनी कार्यकारिणी सदस्यांनी या खर्चास रितसर मंजुरी दिल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी संघाचे पाच लाख रुपये वापरले जावेत. यापर्यंत मदत पोहोचण्यासाठी संघाच्या सदस्यांनी या गावांमध्ये जावे, असे ठरले होते. मात्र, अध्यक्षांनी नेत्यांना हाताशी धरून परस्पर हा कारभार केला. संघाच्या सदस्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप किरण नकाते यांनी केला. नवरात्र उत्सवादरम्यान संघाच्या नावाचा वापर करून जबरदस्तीने व्यापाऱ्यांकडून मोठ्या रकमेची वर्गणी वसूल करण्यात आली.
व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही त्यांच्या नाकावर टिच्चून नगरसेवक म्हणून धाकधपटशाही करीत केवळ स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हा महाप्रसाद केला गेला.
सदस्यांनी विरोध करू नये, म्हणून पोलिसांनाही या कार्यक्रमाला बोलावले गेले, असाही आरोप नकाते यांनी केला.
यावर परमार यांनी हा खर्च मी केला आहे. त्यामुळे माझ्या नगरसेवकपदाचा किंवा मतदारसंघाचा विषय काढू नका, असे सांगताच नकाते, पाटील यांनीही तुम्ही नगरसेवक म्हणून काम करू नका, तर संघाचे अध्यक्ष म्हणून काम करा, संघाच्या नावे काहीही करू नका, ७-८ लाख रुपयांचा खर्च दाखवा, असे सांगितले. सदस्य अध्यक्षांवर आरोपांवर आरोप करताहेत,
अपशब्द वापरत आहेत यावरून शिवराज पोवार भडकले. ही सराफ संघाची सभा आहे. नैतिकतेला सोडून गोंधळ करायची गरज काय? शिव्यांची लाखोली का वाहताय? असे सुनावताच सदस्यांनीही तुम्हाला त्यांची एवढी काळजी का, असे विचारत अधिकच गोंधळ घालायला सुरुवात केली. या सगळ्या
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि वादांमुळे सभेत वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.विद्यमान अध्यक्षांना खिंडीत पकडणारे माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात सोनाली ड्रेसेसला कायमस्वरूपी जागा दिली. यामुळे गायकवाड यांनाही
सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या गोंधळातच विद्यमान अध्यक्ष परमार यांनी संघाच्या
मासिक सभेत निवडणुकीची
तारीख जाहीर केली जाईल,असे सांगत सभा संपल्याचे जाहीर
केले. मात्र, सभाअशी
अर्धवटच कशी संपविली यावरूनही सदस्यांनीत्यानंतरही गोंधळ सुरूच ठेवला.
सभेत हशा..
लिफ्टसाठी एवढे पैसे वापरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, सदस्यांची परवानगी न घेता सगळ्यांना गृहीत धरून कारभार का केलात, असे विचारत अमोल ढणाल, माणिक पाटील यांनी अध्यक्षांवर टिकेची झोड उठवली. यावर कार्यकारिणीच्या बैठकीत इमारतीची डागडुजी आणि लिफ्टसाठीच्या खर्चांसाठीच्या वाढीव तरतुदीची सूचना माणिक पाटील यांनीच मांडल्याचे वाचून दाखविण्यात आले. दोन मिनिटे शांततेत गेल्यानंतर ज्येष्ठ सभासदांनी पाटील तुम्हीच ही सूचना मांडलीय की, असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला.
असा सुरू झाला वाद..
-माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि परमार यांच्यामध्ये संघाच्या कामकाजावरून गेले काही दिवस एकमेकांवर जोरदार आरोप सुरू होते. या विषयांवरून परमार यांच्यावर सभेत हल्ला चढवण्यात विरोधक यशस्वी झाले.
-सोनाली ड्रेसेस्ला संघाची जागा दहा लाख रुपये आणि सात हजार रुपये भाडेतत्त्वावर कायमस्वरूपी देण्याचा करार माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी निवडणुकीपूर्वी घाईगडबडीत केला होता.
-जागा कायमस्वरूपी का दिली गेली, अध्यक्ष म्हणून करार तपासण्याची जबाबदारी तुमची होती म्हणून सर्वच सदस्यांनी गायकवाड यांनाही धारेवर धरले.
-संघाचे नुकसान केल्याबद्दल गायकवाड यांचेच सभासदत्व स्थगित करण्यात यावे, अशी मागणी सुरेंद्र पुरवंत व अमोल ढणाल यांनी केली.
-यावर गायकवाड यांनी तुम्हा सासरा- जावयाचेही मागील सभेत सभासदत्व स्थगित केले होते. तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही, काय करायचे ते करा, असे सुनावताच प्रचंड वाद स्