कळे पोलीस ठाण्याच्या आवारातच राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:24 AM2021-04-18T04:24:34+5:302021-04-18T04:24:34+5:30
कळे वार्ताहर ( दि. १७) : पणुत्रे, ता. पन्हाळा येथील चौघांनी कळे पोलीस ठाण्याच्या आवारातच ...
कळे वार्ताहर ( दि. १७)
: पणुत्रे, ता. पन्हाळा येथील चौघांनी कळे पोलीस ठाण्याच्या आवारातच मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवल्याप्रकरणी पणुत्रेचे सरपंच रंगराव ज्ञानू पाटील यांच्यासह त्यांचे दोन पुतणे शरद सर्जेराव पाटील (३१), प्रल्हाद सर्जेराव पाटील (२९) तसेच विष्णू दगडू पाटील (४२) या चौघांवर कळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सागर पाटील यांनी कळे पोलिसांत दिली.
याबाबत घटनास्थळावरून व कळे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विश्वास पांडुरंग पाटील (५४) व विष्णू दगडू पाटील यांच्यात पूर्वीच्या वादातून आज दुपारी भांडण झाले. या भांडणात विष्णू पाटील याने विश्वास पाटील यास बेदम मारहाण केल्याच्या संशयावरून त्याच्यावर कळे पोलिसांत फिर्याद देण्यासाठी विश्वास पाटील याचे चुलत भाऊ व पणुत्रेचे सरपंच रंगराव पाटील व त्यांचे दोन पुतणे शरद व प्रल्हाद कळे पोलीस ठाण्यात आले. तक्रार देण्यापूर्वीच तेथे विष्णू पाटील पोहोचला या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले.
दरम्यान, विश्वास पांडुरंग पाटील यास उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.
अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस करीत आहेत.