राधानगरी धरण भरले, दोन दरवाजे उघडले, ८२ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:32 PM2019-07-31T12:32:10+5:302019-07-31T15:26:18+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली असली तरी राधानगरी धरण आज सकाळी ७ वाजता भरले.
कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेले राधानगरी धरण आज सकाळी साडे आकरा वाजता पुर्ण भरले. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील केर्ली येथे रस्त्यापर्यंत पाणी आले आहे.
एकुण ५७६८ क्युसेक्स विसर्ग सुरु, ३४७.५ फुट पाणीपातळी झाल्यावर ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला. त्यानतर पाऊण तासाने ३ नंबरचा दरवाजाही सुरु झाला. यातून प्रत्येकी एकहजार चारशेहे प्रमाणे दोनहजार आठशेहे व जलविद्युत निर्मिती केन्द्रातून एकहजार चारशे असा एकुण चारहजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. दुपारी १.१५ वाजता राधानगरी धरणाचा ५ नंबरचा दरवाजा उघडल्यामुळे नदीला पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला.
५७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे. आज सकाळी ११-३० वाजता राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडून १४२८ क्यूसेक तर पायथा गृहातून १४०० असा एकूण २८२८ क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पाणी पातळी पहाटे २-२0 वाजता ३९ फूट तर ८ वाजता ती ३९ फूट २ इंच इतकी नोंदवली आहे. पावसाचा जोर कायम असून काही तासातच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे तीन क्रमांकाचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे. यामुळे पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जंगमहट्टी मध्यम प्रकल्पही काल सकाळी ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.
गगनबावडा मुख्य रस्ता वाहतूकीस सुरु
कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्ता वाहतुकीस सुरु करण्यात आलेला आहे. मांडुकली व मार्गेवाडी जवळ पाणी पूर्णपणे उतरले असून, लोंघे गावाजवळ फक्त दोन इंच पाणी रस्त्यावर आहे. लोंघे गावाजवळून फक्त एका वेळी एक वाहन सोडले जात आहे. राधानगरी धरणाचे इतर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले तर पुन्हा कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.
आरळा शित्तूर राघुचावाडा रस्त्यावर पाणी
आरळा शित्तूर राघुचावाडा (तालुका शाहुवाडी) जिल्हा मार्ग-१ किमी १५/३५० रस्त्यावर पाणी आलेने वाहतुक बंद केली आहे.मात्र शित्तूर-तुरुकवाडी-मलकापुर-निळे-भेंडवडे-उदगिरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.