Kolhapur: राधानगरी-खिंडी व्हरवडे घाट मार्ग उद्यापासून बंद, वाहतूक मार्गातील बदल..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:34 PM2024-08-22T18:34:19+5:302024-08-22T18:35:12+5:30

दहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार

Radhanagari-Khindi Verwade Ghat road closed from tomorrow, change in traffic route | Kolhapur: राधानगरी-खिंडी व्हरवडे घाट मार्ग उद्यापासून बंद, वाहतूक मार्गातील बदल..जाणून घ्या

संग्रहित छाया

गौरव सांगावकर

राधानगरी : कोल्हापूरराधानगरी मार्गांवरील गैबी घाट येथील (करंफेन धबधबा) येथील मोरी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याने या मार्गांवरील वाहतूक वळवून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. दहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

कोल्हापूरहून येणारी वाहने खिंडी व्हरवडे येथून गुडाळ तारळे मार्गे राधानगरीकडे वळवण्यात आली आहेत. तर कोकणातून येणारी अवजड वाहने राधानगरी बस स्थानकनजीक इंडॉल कॉर्नर येथून पिरळ - तारळे, शिरगांव मार्गे कोल्हापूरकडे वळवण्यात आली आहेत.

वाहतूक मार्गातील हा बदल उद्या, शुक्रवार दि. २३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत राहील. बदल केलेल्या मार्गांवर जागो जागी दिशादर्शक फलक लावण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी.

Web Title: Radhanagari-Khindi Verwade Ghat road closed from tomorrow, change in traffic route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.