राधानगरी तालुक्यात १५ रूग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:34+5:302021-05-01T04:22:34+5:30
राधानगरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राधानगरी तालुक्यात शुक्रवारी १५ रुग्ण वाढले. यात वडाचीवाडी येथील एकाच कुटुंबातील ४ व ...
राधानगरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राधानगरी तालुक्यात शुक्रवारी १५ रुग्ण वाढले. यात वडाचीवाडी येथील एकाच कुटुंबातील ४ व न्यू करंजे येथील दोनजण आहेत. मागील तीन आठवड्यात बाधित रुग्णांची संख्या २२६ झाली. यातील ९५ जण बरे झाले असून, ८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ४१ रुग्ण इतर तालुक्यातील आहेत. आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कार्यवाही सुरु असूनही रुग्ण वाढीचा वेग कमी झालेला नाही. राधानगरी, कसबा तारळे, राशिवडे, सरवडे अशा मोठ्या बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत हा आकडा २२६वर पोहोचला. यामध्ये इतर तालुका व जिल्ह्यातील ४१ जण आहेत. स्थानिक रुग्णांपैकी ९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात ७, कोविड केअर सेंटरमध्ये ५७, खासगी रुग्णालयात १२ व घरी दहाजण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.