राधानगरी तालुक्यात जनावरांना होतेय 'लंपी ' रोगाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 02:23 PM2020-11-12T14:23:33+5:302020-11-12T14:48:39+5:30
'Lampi' disease, amimal, health, doctor, kolhapurnews 'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. 'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना मोठी खाज सुटते व तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालक मोठया चिंतेत सापडले आहेत.
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : 'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना मोठी खाज सुटते व तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालक मोठया चिंतेत सापडले आहेत.
विदर्भ किंवा मराठवाडा या ठिकाणी तुरळक प्रमाणात 'लंपी 'या विषानूजन्य त्वचारोगाने बाधीत असणारी जनावरे सापडतात. पण तिथे लस उपलब्ध असल्याने या संसर्गजन्य आजाराचा फैलाव अटोक्यात आहे. पण गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात या संसर्गजन्य रोगाची जनावरे आढळू लागल्याने दुग्ध व्यावसाईकामध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यात कोल्हापूर पशुवैद्यकीय विभागाकडे ही लस उपलब्ध नसल्याने व हा संसर्गजन्य रोग असल्याने पशुपालकांसह पशुवैद्यकीय विभागासमोर एक संकट उभे ठाकले आहे.
बाधीत जनावराच्या पूर्ण अंगावर पुरळ उठणे, अशक्तपणा, ताप, अंगाला खाज सुटणे, दुधाळ जनावरांचे दुध पूर्णपणे बंद होणे अशी लक्षणे दिसतात व सात दिवसात उपचार न झाल्यास ते जनावर दगावण्याची शक्यता असते. हा संसर्गजन्य आजार असल्याचे डॉक्टरांचे मत असल्याने गोठा प्रकल्पाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्यात प्रचंड भिती निर्माण झाली आहे.
धामोड (ता. राधानगरी ) येथील गणपती भामटेकर यांच्या गाईला या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे धामोड येथील पशुवैद्यकीय डॉ. अनिल शिंदे यांनी तत्काळ या गायीची पाहणी करून उपचार सुरू केले आहेत. राधानगरी तालुक्यात अशा आजाराचे अद्याप एकही जनावर सापडलेले नाही. तालुक्यात लंपी आजार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे.
सलग सात दिवस बाधीत जनावरांवर उपचार केल्यावर आजार संपुष्टात येतो. मात्र हा विषाणूजन्य आजार असल्याने इतर जनावरांनाही त्याचा धोका होऊ शकतो. "
- अनिल शिंदे,
पशुधन पर्यवेक्षक, धामोड