रविकिरण आंदोलनामुळे उद्योगांना हानी पोहोचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:29+5:302021-03-04T04:45:29+5:30
हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर मिलमधील आंदोलनामुळे कंपनीसह या औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या उद्योगांना ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर मिलमधील आंदोलनामुळे कंपनीसह या औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या उद्योगांना हानी पोहोचेल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यास प्रतिबंध करून उपाययोजना करावी, असे निवेदन कंपनीच्या कामगारांच्या वतीने आमदार राजेश पाटील व तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही रविकिरण पेपर मिल कंपनीचे कर्मचारी असून आम्हाला पगार, प्रॉव्हिडन्ट फंड, ईएसआय आणि पगारी रजा नियमानुसार मिळतात. तसेच कंपनीमधील वातावरणही चांगले आहे. तरी कंपनीमध्ये जो काही संप केला जात आहे. त्यात आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. आम्हाला वेळच्यावेळी सर्व सुविधा मिळतात. तरी आमच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. महागाई भत्ता कंपनीकडून दिला जात नसल्याच्या कारणावरून कंपनीत श्रमिक संघटना सर्व श्रमिक संघ या बॅनरखाली आंदोलन केले जात आहे. यामध्ये कामगार संघटना, राजकीय प्रतिनिधींनी या आंदोलनाला भेटी दिल्या. त्यानंतर अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, तोडगा निघत नाही. असे आंदोलन सुरू असल्याने हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. जे येथील उद्योगांना हानी पोहचवू शकते. तरी त्यामध्ये योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी कामगारांनी निवेदनातून केली आहे.