रघुराज मेटकरी यांना ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:54+5:302021-04-22T04:24:54+5:30
कोल्हापूर : विटा (जि. सांगली) येथील साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णरत्ने’ या पुस्तकास कोल्हापुरातील शांताई शिक्षण संस्थेकडून ...
कोल्हापूर : विटा (जि. सांगली) येथील साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णरत्ने’ या पुस्तकास कोल्हापुरातील शांताई शिक्षण संस्थेकडून उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनकरराव पाटील यांनी पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार निवड समितीत प्रा. कीर्ती कदम, अभियंता अजिंक्य पाटील, प्रा. धनाजी वाघ, तानाजी निकम, प्रा. पाटील यांचा समावेश होता. मेटकरी यांना आतापर्यंत राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा ग. ह. पाटील पुरस्कार, आदर्श शिक्षक, व्यसनमुक्ती कार्य पुरस्कार, विनोद प्रतिष्ठानचा आचार्य अत्रे पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा उत्कृष्ट वाङ्मय असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. मेटकरी हे विटा येथे गेल्या ३९ वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करत आहेत.
फोटो (२१०४२०२१-कोल-रघुराज मेटकरी (पुरस्कार)
===Photopath===
210421\21kol_4_21042021_5.jpg
===Caption===
फोटो (२१०४२०२१-कोल-रघुराज मेटकरी (पुरस्कार)