‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिकारीपदी राहुल भिंगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:02+5:302021-08-14T04:28:02+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक अधिकारीपदी राहुल रामचंद्र भिंगारे यांची शासनाकडून नियुक्ती झाली आहे. ...
कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक अधिकारीपदी राहुल रामचंद्र भिंगारे यांची शासनाकडून नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरूवारी आपला पदभार स्वीकारला. ते सध्या नांदेड एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी कार्यरत होते.
कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांची नांदेड एमआयडीसी येथे सोमवारी (दि. ९ ऑगस्ट) बदली झाली. त्यांच्या जागी राहुल भिंगारे यांची शासनाने नियुक्ती केली. प्रादेशिक अधिकारी भिंगारे यांचे मूळ गाव पंढरपूर आहे. उद्योग विभागामध्ये ते सन २०१५मध्ये नागपूर एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक म्हणून रूजू झाले. पुढे त्यांनी लातूरच्या क्षेत्र व्यवस्थापकपदी काम केले. तेथून त्यांची नांदेड येथे प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्ती झाली. दरम्यान, कोरोना आणि महापुराचा कोल्हापूर विभागातील उद्योगांना आणि पर्यायाने या परिसरातील नागरिकांना फटका बसला आहे. त्यांना बळ देण्याच्या अनुषंगाने उद्योग विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यासह शिरोली, गोकुळ-शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकितसह अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांसह अन्य अडचण दूर करण्याला माझे प्राधान्य राहणार असल्याचे भिंगारे यांनी सांगितले.
फोटो (१३०८२०२१-कोल-राहुल भिंगारे (एमआयडीसी)
130821\13kol_1_13082021_5.jpg
फोटो (१३०८२०२१-कोल-राहूल भिंगारे (एमआयडीसी)