राहुल पाटील यांचा भोगावती कारखान्यातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:21+5:302021-07-16T04:18:21+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी युवा नेते राहुल पाटील सडोलीकर यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर भोगावती साखर कारखान्याच्या ...

Rahul Patil felicitated by Bhogawati factory | राहुल पाटील यांचा भोगावती कारखान्यातर्फे सत्कार

राहुल पाटील यांचा भोगावती कारखान्यातर्फे सत्कार

Next

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी युवा नेते राहुल पाटील सडोलीकर यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर भोगावती साखर कारखान्याच्या वतीने सत्काराप्रसंगी पाटील यांनी वरील उद्गार काढले.

कारखान्याच्या वतीने गृहराज्यमंत्री व पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ. पी. एन. पाटील सडोलीकर, आमदार ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व संचालक मंडळ, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी

: परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यातर्फे जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार करताना पालकमंत्री ना. सतेज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, आमदार ऋतुराज पाटील व संचालक मंडळ.

Web Title: Rahul Patil felicitated by Bhogawati factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.