लस आणि थकीत मानधन द्या, राहुल पाटील, वंदना जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 01:03 PM2021-07-17T13:03:49+5:302021-07-17T13:09:08+5:30

कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या लसीचा पुरवठा करण्यात यावा, तसेच मानधन आणि आरोग्य सुविधांसाठीचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य समिती सभापती वंदना जाधव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

Rahul Patil, Vandana Jadhav's demand to the Health Minister | लस आणि थकीत मानधन द्या, राहुल पाटील, वंदना जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य सभापती वंदना जाधव यांनी शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अरुण जाधव उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देलस आणि थकीत मानधन द्याराहुल पाटील, वंदना जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर  : जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या लसीचा पुरवठा करण्यात यावा, तसेच मानधन आणि आरोग्य सुविधांसाठीचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य समिती सभापती वंदना जाधव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या टोपे यांची या दोघांनीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अरूण जाधव उपस्थित होते.

जिल्ह्याला रोज ५० हजार लसीचे डोस मिळावेत, पहिल्या लाटेमध्ये काम केलेल्या जादा मनुष्यबळाचे पाच कोटी रुपये थकीत आहेत, ते अदा करावेत, दुसऱ्या लाटेमध्ये जादा मनुष्यबळ लागणार आहे, त्यासाठी तीन कोटी रुपये द्यावेत, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून पुढील सहा महिन्यांसाठी ३० कोटी रुपये मिळावेत, ससंभाव्य पूरस्थितीचा विचार करता वैद्यकीय पथके, जादा मनुष्यबळ, औषधे, ॲन्टिजन किट यासाठी आवश्यक असणारे दोन कोटी रुपये मिळावेत, आरोग्य विभागाकडील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील कंत्राटी सफाई कामगारांचे गेले दोन वर्षे मानधन थकलेले आहे.

यासाठी तीन कोटी रुपये अदा करावेत, अशा निवेदनातून मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

 

Web Title: Rahul Patil, Vandana Jadhav's demand to the Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.