इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा ; १२ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:46+5:302021-09-04T04:30:46+5:30
अड्डा चालक व घरमालक मारुती लक्ष्मण नरवाडे ( वय ४७, रा. काडापुरे तळ), युवराज आनंदा कदम ३०, रा. कुलकर्णी ...
अड्डा चालक व घरमालक मारुती लक्ष्मण नरवाडे ( वय ४७, रा. काडापुरे तळ), युवराज आनंदा कदम ३०, रा. कुलकर्णी मळा), गणेश नारायण काजवे (४०, रा. काडपुरे तळ), सागर हिंदुराव शिवलिंगे (३०, रा. गुजरमळा), सिद्धारूढ कल्याणी गुळगी (३६, रा. गुरुकन्नननगर), अशोक गोविंद धुले ६०, रा. इंदिरा कॉलनी कबनूर), सोमनाथ शरणाप्पा वागदरी (३६, रा. कोकरे मळा), सुरेश महादेव म्हेत्रे (३६, रा. दातारमळा), सागर आनंदा आगम (३३, रा. तांबेमाळ), दिलीप नागाप्पा हिटनळ्ळी (३९, रा. लिंबू चौक), राजू बाळू पाटील (१५, रा. तांबे माळ),
बसवराज शंकर हुबळी (५६, रा. गुरुकन्नननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काडापुरे तळ येथे एका घरामध्ये तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक महामुनी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार २०० रुपयांची रोकड, ४८ हजार रुपयांचे ८ मोबाईल तसेच १ लाख ४० हजार किमतीची ३ वाहने व जुगाराचे साहित्य असा २ लाख १० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.