कुंभोज दारू अड्यावर छापा, २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:44+5:302021-03-13T04:42:44+5:30

हातकणंगले : कुंभोज (ता. हातकणंगले) येथे तीन ठिकाणी देशी-विदेशी आणि गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाडी टाकून हातकणंगले पोलिसांनी २८ हजार ...

Raid on Kumbhoj liquor den, 28,000 items confiscated | कुंभोज दारू अड्यावर छापा, २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

कुंभोज दारू अड्यावर छापा, २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next

हातकणंगले : कुंभोज (ता. हातकणंगले) येथे तीन ठिकाणी देशी-विदेशी आणि गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाडी टाकून हातकणंगले पोलिसांनी २८ हजार रुपयांची दारू जप्त करून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत छापेमारीचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे.

कुंभोज गावचा उरूस महाशिवरात्रीला असतो. कोरोना संकटामुळे या वर्षी उरूस रद्द करण्यात आला होता. मात्र, उरूस असल्याने पाहुण्यांची गर्दी होणार म्हणून गावामध्ये देशी-विदेशी दारूचा साठा करण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी अतिश चाँदसिंग मलकेकर यांच्या घरी धाड टाकून देशी-विदेशी १२ हजार ८६० रुपयांची दारू जप्त केली. यानंतर स्वाती मलकेकर याच्या घरी २ हजार पाचशे, तर अनिल रामचंद्र कोळी यांच्या घरी ३ हजार रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक भवड, उपनिरीक्षक सीमा बडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.

Web Title: Raid on Kumbhoj liquor den, 28,000 items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.