Kolhapur: कोदे बुद्रूकच्या फार्महाऊसमधील डान्सबारवर छापा, रिसॉर्ट मालकासह ४२ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:03 PM2024-11-01T13:03:33+5:302024-11-01T13:03:48+5:30
शासकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची रंगीत-संगीत पार्टी
गगनबावडा / कोल्हापूर : कोदे बुद्रूक पैकी आंबेवाडी (ता. गगनबावडा) येथील नयनील फार्महाऊस रिसॉर्टमधील डान्सबारवर छापा टाकून पोलिसांनी ११ नृत्यांगना आणि ४२ जणांना ताब्यात घेतले. बुधवारी (दि. ३०) रात्री उशिरा केलेल्या कारवाईत रिसॉर्टमधील दारू आणि मोबाइल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शाहूवाडी उपविभागाचे उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने कारवाई केली. कोल्हापुरातील एका शासकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन केले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. कोदे बुद्रूक पैकी आंबेवाडी येथील नयनील फार्महाऊस रिसॉर्टवर बेकायदेशीर डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपअधीक्षक पवार यांनी तातडीने बुधवारी रात्री गगनबावडा पोलिसांच्या मदतीने फार्महाऊसवर छापा टाकून कारवाई केली.
त्यावेळी अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या नृत्यांगना आढळल्या. तसेच विनापरवाना मद्यप्राशन करणारे तरुण आढळले. रंगीत-संगीत पार्टी करणाऱ्या ३१ जणांसह ११ नृत्यांगनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रिसॉर्टमालक रूपेश सुर्वे (मंगळवार पेठ, कोल्हापूर) याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईने गगनबावडा तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे समोर आले आहेत.
उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्यासह गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, अंमलदार श्रीकांत मामलेकर, अमोल तेली, मानसिंग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
यांच्यावर झाली कारवाई
फार्महाऊस मालक रूपेश सुर्वे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) निखिल नंदकुमार सूर्यवंशी (वय ३८, रा. सुतारमळा, कोल्हापूर), शैलेंद्र सुरेश गोडबोले (५०, रा. सांगली), शेखर सुखदेव पाटील (३७, रा. पुणे), हरीश लक्ष्मण चौगले (२८, रा. कोल्हापूर), राजवर्धन रमाकांत साळोखे (३७, रा. गोरेगाव ईस्ट, मुंबई), सुहास दत्तात्रय घोरपडे (३८), रोहित नंदकुमार वीरभद्रे (३८, दोघे रा. हडपसर, पुणे, अमित रघुनाथ घोलप (रा. जाधववाडी, कोल्हापूर),
सतीश शिवाजी पाटील (३७, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर), मंगेश अशोकराव ढोबळे (३५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), रोहन संजय माळी (३३, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), जितेंद्र पांडुरंग पाटील (४१, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), अतिश अशोक हिराणी (३४, रा. टाकाळा चौक, कोल्हापूर), मोहन मारुतीराव हजेरी (३६, रा. पिंपरी, पुणे), रोहन जयसिंग निकम (४०, रा. सुतारमळा, कोल्हापूर), किरण राजाराम सूर्यवंशी (३८, रा. पुणे),
मुदस्सर अस्लम रुकडीकर (३८, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, सध्या रा. नवी मुंबई), गणेश दशरथ जाधव (४० रा. केळोशी बुद्रूक, ता. राधानगरी) परशुराम दगडू पाटील (२४), पांडुरंग बजरंग पाटील (२६), प्रकाश विलास पाटील (२३, तिघे रा. कोदे बुद्रूक) यांच्यावर कारवाई झाली. कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी पोलिसांकडे गयावया केल्या.