लक्ष्मीपुरीत लॉजवरील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:39 AM2020-10-21T11:39:05+5:302020-10-21T11:40:16+5:30
crimenews, police, kolhapurnews कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील एका लॉजवर सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक, व्यवस्थापक अशा एकूण अकरा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. छाप्यात पोलिसांनी १८ हजारांच्या रोकडीसह एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील एका लॉजवर सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक, व्यवस्थापक अशा एकूण अकरा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. छाप्यात पोलिसांनी १८ हजारांच्या रोकडीसह एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : मुझफ्फर साहेबजी मुल्ला (वय ३२, रा. गोकुळ शिरगाव), विनायक जयसिंग खाडे (३४), मिलिंद अनिल मुदगल (२८), प्रकाश महादेव जाधव (३६), फारुख अल्लाबक्ष मोमीन (३८), अमर कांबळे (पाचजण रा. यादवनगर), नियाज सय्यदअली काझी (३५, रा. शाहू मैदान परिसर), संजय भीमराव पोवार (३७, रा. शास्त्रीनगर), प्रमोद अशोक जगताप (४५, रा. मंगळवार पेठ), लॉज व्यवस्थापक विशाल आनंदा जाधव (२८, रा. हातकणंगले), लॉजमालक पराग प्रतिनाथ डुणुंग (रा. लक्ष्मीपुरी) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती, लक्ष्मीपुरीतील प्रफुल्ल लॉजमध्ये तीनपानी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लॉजवर छापा टाकला. या ठिकाणी संशयित जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख १८ हजार ६६० रुपयांसह सहा मोबाईल संच असा एकूण ४८ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगार खेळणाऱ्यांना एकत्र आणणारा संशयित अमर कांबळेसह लॉजमालक आणि व्यवस्थापकावरही पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल नामदेव पाटील करीत आहेत.