हलकर्णी येथील विदेशी मद्याच्या साठ्यावर छापा,अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:52 PM2019-08-22T13:52:42+5:302019-08-22T13:53:41+5:30
नाईक वसाहत, हलकर्णी (ता. चंदगड) येथील राहत्या घरामागे शेतवडीत लपविलेल्या विदेशी मद्याच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अडीच लाखांचे मद्याचे ४२ बॉक्स जप्त केले. या प्रकरणी संशयित मद्यसाठा मालक संजय पांडुरंग नाईक (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : नाईक वसाहत, हलकर्णी (ता. चंदगड) येथील राहत्या घरामागे शेतवडीत लपविलेल्या विदेशी मद्याच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अडीच लाखांचे मद्याचे ४२ बॉक्स जप्त केले. या प्रकरणी संशयित मद्यसाठा मालक संजय पांडुरंग नाईक (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांना नाईक वसाहत, हलकर्णी येथील संशयित संजय नाईक याच्या घरामागे विदेशी मद्याचा साठा असून चोरून मद्यविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गडहिंग्लज विभागाचे निरीक्षक एस. एस. बरगे यांना कारवाईचे आदेश दिले.
बरगे यांनी सहकारी ए. बी. वाघमारे, एस. आर. ठोंबरे, जवान पी. डी. भोसले, एन. एस. केरकर, आर. एम. कोळी, ए. टी. थोरात यांना सोबत घेऊन बुधवारी दुपारी छापा टाकला असता मद्यसाठा आढळून आला. पथकाची चाहूल लागताच संशयित नाईक हा पळून गेला.