गांधीनगरात छापा; दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:39+5:302021-06-05T04:18:39+5:30

गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा व विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांच्या ...

Raids in Gandhinagar; Seizure of liquor | गांधीनगरात छापा; दारूसाठा जप्त

गांधीनगरात छापा; दारूसाठा जप्त

Next

गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा व विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने अजय माने याच्या घरासमोर असलेल्या पान टपरीच्या बाजूला एका पोत्यात ठेवलेली पाच हजार रुपयाची गोवा बनावटीची दारू छापा टाकून पकडली. याबाबतची फिर्याद हवालदार कृष्णात बाळासाहेब पिंगळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून एका विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या पथकामध्ये सहायक फौजदार अजय गोडबोले, हवालदार वसंत पिंगळे, सचिन देसाई, दीपक घोरपडे, अनमोल पवार, केसरे यांचा समावेश होता.

मुद्देमाल केवळ ५ हजार?

इतक्या मोठ्या फौजफाट्यासह आलेल्या या पथकाने केवळ पाच हजार रुपयांची दारू पकडल्याची नोंद केली आहे. प्रत्यक्षात मात्र दारूचा मोठा साठा सापडल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: Raids in Gandhinagar; Seizure of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.