मिरज, कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे

By admin | Published: March 23, 2015 11:17 PM2015-03-23T23:17:55+5:302015-03-24T00:14:11+5:30

पानसरे हत्या प्रकरण : गुन्हेगारांची धरपकड; चौघे ताब्यात

Raids on paddy sticks in Miraj, Karnataka | मिरज, कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे

मिरज, कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे

Next

सांगली : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मिरजेतील एका दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी रविवारी रात्रीपासून मिरज व कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे टाकून संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. या कारवाईत सांगली पोलिसांना न घेता कोल्हापूर पोलिसांची स्वतंत्रपणे कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत चार गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र तपासात मदत होईल, अशी कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. यामुळे धरपकड व चौकशी सत्र सुरूच आहे.फासेपारधी गुन्हेगाराने २५ लाखांची ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केल्याची माहिती एका दाम्पत्याने दिली असली तरी, पोलिसांचा त्यावर पूर्ण विश्वास नाही. या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने, जी माहिती मिळेल, तो धागा पकडून पोलीस पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी या दाम्पत्याची विशेष काळजी घेऊन, ज्या फासेपारधी गुन्हेगाराने ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केली, त्याबद्दल बारकाईने माहिती घेणे सुरू ठेवले आहे. या दाम्पत्याने या गुन्हेगाराचे नावही पोलिसांना दिले आहे. त्याचे मिरज व कर्नाटकात वास्तव्य असल्याने रविवारी रात्री कोल्हापूर पोलिसांची चार पथके मिरजेत दाखल झाली होती. त्यांच्यासोबत हे दाम्पत्यही होते. पथकाने मिरज तसेच तालुक्यातील पारधी तांड्यांवर छापे टाकले. कर्नाटकातही काही पथके रवाना झाली होती. तेथील पोलिसांच्या मदतीने छापे टाकून गुन्हेगारांचा शोध घेतला. चार संशयित हाती लागले; पण दाम्पत्याने नाव सांगितलेला गुन्हेगार मिळालेला नाही.रेकॉर्डवरील सातशेहून अधिक दुचाकी चोरट्यांची चौकशी झाली आहे. वाळवा तालुक्यातील चार तरुणांची नावे पुढे आली होती, त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. जोपर्यंत ठोस माहिती हाती लागत नाही, तोपर्यंत चौकशी व छापासत्र सुरूच राहील. (प्रतिनिधी)


नेतेही चौकशीच्या जाळ्यात!
सांगली जिल्ह्यात फासेपारधी समाज व गुन्हेगारांना एकत्रित करुन त्यांना शासनाच्या सोयी-सुविधा मिळवून देणारे काही नेते कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. या नेत्यांना प्रत्येक पारधी कुटुंबातील गुन्हेगार परिचयाचा आहे. यामुळे या नेत्यांकडून काही माहिती मिळते का, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Raids on paddy sticks in Miraj, Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.