पानसरे हत्येप्रकरणी ढालगावात छापे

By admin | Published: September 22, 2015 12:45 AM2015-09-22T00:45:32+5:302015-09-22T00:59:13+5:30

दोन घरांची झडती : प्रवीण लिमकरच्या नातेवाइकांकडे चौकशी

Raids in the slums in Palsar murder: | पानसरे हत्येप्रकरणी ढालगावात छापे

पानसरे हत्येप्रकरणी ढालगावात छापे

Next

कवठेमहांकाळ : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या यंत्रणेने सनातन संस्थेच्या साधकांभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सहा ते सातजणांच्या पथकाने मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित प्रवीण रमेश लिमकर (वय ३०) याच्या ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन नातलगांच्या घरांवर छापे टाकले. दोन ते तीन तास घरांची झडती सुरू होती. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.तपास यंत्रणेच्या हाती काय लागले, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या कारवाईमागील नेमके कारण समजू शकले नसले, तरी सहा वर्षांपासून फरार असलेला प्रवीण लिमकर त्याच्या नातलगांच्या संपर्कात आहे का, याची चौकशी करण्यासाठीच छापे टाकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी लिमकरच्या सर्व नातलगांचे मोबाईल क्रमांक घेतले असल्याचे समजते.गोव्यातील मडगावात १६ आॅक्टोबर २००९ रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासूर प्रतिमा वधाच्या कार्यक्रमापासून शंभर मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटप्रकरणी सारंग अकोलकर, रुद्रगौडा पाटील, जयप्रकाश हेगडे आणि प्रवीण लिमकर या सनातन संस्थेच्या चार साधकांची नावे प्रमुख संशयित म्हणून पुढे आली होती. बॉम्ब तयार करण्यासोबतच शस्त्र चालविण्याचे कारवाईबाबत कमालीची गुप्तताप्रशिक्षण घेतलेले सनातन संस्थेचे हे चार साधक गेल्या सहा वर्षांपासून फरारी आहेत. त्यांच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीही तपास यंत्रणा त्यांच्या मागावर आहेत.
त्यातील प्रवीण लिमकर मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावचा आहे. तो कोल्हापुरात ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर होता. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याला ताब्यात घेतल्यानंतर तपास यंत्रणांचा ‘सनातन’वरील संशय आणखी बळावला आहे.
मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित रुद्रगौडा पाटील याचेच नाव पानसरे हत्येप्रकरणी प्रमुख संशयित म्हणून पुढे आल्यानंतर पोलिसांनी मडगाव प्रकरणातील इतर तीन संशयितांकडेही मोर्चा वळवला असल्याचे समजते.

सहा वर्षांपासून फरारी असलेल्या प्रवीण लिमकर याच्या नातलगांच्या ढालगाव येथील घरी तपास यंत्रणेच्या सहा ते सातजणांच्या पथकाने छापे टाकले असल्याचे समजते. दुपारी बाराच्यादरम्यान हे पथक ढालगाव येथे दाखल झाले. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनाही याची माहिती नव्हती. सुरुवातीला प्रदीप दिगंबर लिमकर आणि नंतर दीपक दिगंबर लिमकर या प्रवीणच्या दोन चुलत्यांच्या घरांची पथकाने झडती घेतली. या कारवाईदरम्यान घरातील सर्व सदस्यांना घरातून बाहेर काढण्यात आले होते. आतमध्ये पथकाने नेमका कशाचा तपास केला आणि त्यांना काय सापडले, याचीही गुप्तता पाळण्यात आली आहे. दोन ते तीन तासांच्या कारवाईनंतर परत जाताना मात्र पथकाने सर्व नातलगांचे मोबाईल क्रमांक घेतले असल्याचे समजते. या कारवाईमागील नेमका हेतू समजू शकला नाही. परंतु मोबाईल क्रमांक घेतल्याने त्याच्याआधारे नातेवाईक आणि प्रवीण लिमकर यांचा संपर्क आहे का, याची चौकशी पथक करणार असल्याचे समजते.

Web Title: Raids in the slums in Palsar murder:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.