रेल्वे फाटक पादचाऱ्यांसाठी बंद, नागरिकांच्यामधून नाराजी; परीख पुलाखालून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:38 PM2017-11-27T16:38:24+5:302017-11-27T16:46:32+5:30
रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना पाहता रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला आहे.
राजारामुपरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे व मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचार्यांसाठी जवळचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज अनेक नागरिक ये - जा करत होते. आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबूभाई परिघ पूलांच्या खालून प्रवास करावा लागणार आहे. परीघ फूल अधिच अरुंद आहे. त्यामध्ये आता वाहनधारक व पदाचारी एकाच वेळी ये - जा करत असल्याने वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.
रेल्वे रुळावरून पदचार्यांनी प्रवास करू नये अशा वारंवार सूचना देवून सुध्दा प्रवासी येथून ये - जा करत असल्याने ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने कर्मचाऱ्यांवर तणाव येत आहे. येथील वाहतूक बंद करावी अशा सूचना वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत आल्यानेच ही शुक्रवार पासून ही वाहतूक बंद केली आहे.
- विजयकुमार
(रेल्वेस्थानक) प्रबंधक
वादाचे प्रसंग....
रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचारी यांना आता परीघ पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेज पाणी येत असल्याने वाहनाचे पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचारी यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधवा पण त्यापूर्वी परीघ पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईने काम तात्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.