कोल्हापूरचे रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुल्ल

By admin | Published: May 27, 2015 12:05 AM2015-05-27T00:05:34+5:302015-05-27T00:57:25+5:30

आरक्षणासाठी रांगा : उन्हाळी सुटी संपवून प्रवासी परतीच्या मार्गावर

The railway station travelers of Kolhapur are full | कोल्हापूरचे रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुल्ल

कोल्हापूरचे रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुल्ल

Next

कोल्हापूर : उन्हाळी सुटी संपण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांना आता पुन्हा घरी परतण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकासह एस. टी. बसस्थानक याठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तिकीट आरक्षणासाठी रांगाच्या रांगा लागल्या होत्या.
मध्य रेल्वेच्या अखत्यारीत कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे रेल्वेस्थानक येते. येथून रोज एक्स्प्रेस व पॅसेजर रेल्वेगाड्या जातात. सुटी सुरू झाल्यापासून आरक्षण खिडकीवर तिकीट घेण्यासाठी तोबाच्या तोबा गर्दी आहे. रोज सकाळी आठ ते दुपारी दोन व त्यानंतर अडीच ते रात्री आठ वाजेपर्यंत अशा तीन खिडक्यांवर तिकीट आरक्षणाची सोय आहे; पण तिकीट घेण्यासाठी पहाटे साडेपाच-सहा वाजल्यापासून रांगा असतात, तर रात्री आरक्षण कार्यालयाच्या दारातच काही प्रवासी तिकिटासाठी झोपलेले असतात, हे नित्याचेच चित्र आहे.
दुसरीकडे, अनारक्षित तिकीट खिडकीवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. या रेल्वेस्थानकावरून रोज सुटणाऱ्या १९ लांब पल्ल्याच्या गाड्यांना (एक्सप्रेस व पॅसेंजर मिळून) कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-पुणे, तर रात्री सुटणारी कोल्हापूर-सोलापूर प्रवाशांची गर्दी असते. त्याचबरोबर दुपारी एक वाजून २० मिनिटांनी राणी चन्नमा एक्सप्रेस (तिरूपतीला जाणारी) सुटते. याही रेल्वेला गर्दी असते, तर रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस (कोल्हापूर ते मुंबई ) व सह्याद्री एक्सप्रेस (कोल्हापूर-मुंबई) या गाड्यांनाही कायम गर्दी असते. तिकीट आरक्षणासाठी सध्या तीन खिडक्या आहेत. पण, त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आरक्षण खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत प्रवासी भर उन्हात तिकीट आरक्षण कार्यालयाबाहेर रांगा लावून उभे होते. दुपारी दोन वाजल्यानंतर ही संख्या कमी झाली. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी मोठी होती. (प्रतिनिधी)

आॅनलाईन बुकिंगची सोय तरी गर्दी
रेल्वे प्रशासनाने ग्राहकांच्या सोयीसाठी आॅनलाईन बुकिंग व्यवस्था सुरू केली आहे. त्याचबरोबर ९० दिवस (तीन महिने) अगोदर बुकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. पण, आॅनलाईन बुकिंग सुविधा असूनही आरक्षण तिकीट खिडकीवर प्रवाशांची तोबा गर्दी असते.

Web Title: The railway station travelers of Kolhapur are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.