जिल्हा सराफ संघातर्फे रेल रोको
By admin | Published: April 1, 2016 01:07 AM2016-04-01T01:07:12+5:302016-04-01T01:30:14+5:30
अबकारी कर, पॅनकार्ड सक्ती : सराफ संघाचे २९ व्या दिवशी आंदोलन कायम; ४ एप्रिलपर्यंत बंद
कोल्हापूर : अबकारी कराच्या निषेधार्थ आणि पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघातर्फे गुरुवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वेस्थानकात निदर्शने करून ‘रेल रोको’ आंदोलन केले. २९ व्या दिवशीही बंद कायम ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघातर्फे करण्यात आला आहे. हे आंदोलन ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिने उत्पादनांवर लावलेल्या एक टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा २९ दिवस देशव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेतील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवून सराफांनी संपात सहभाग नोंदविला आहे. देशपातळीसह जिल्हा पातळीवरही विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा सराफ व्यावसायिक प्रयत्न करत आहेत. शहर व जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही विविध आंदोलने करून बंदची व्याप्ती वाढविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सराफ, सुवर्णकारांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी रेल्वे स्टेशन प्रबंधक मीना सुग्रीव यांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वे नियोजित वेळेनुसार जर सुटली नाही, तर आंदोलनकर्त्यांवर रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करणे अटळ आहे. अशी आंदोलनकर्त्यांना सूचना देताच हे आंदोलन ११ वाजता घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी ‘एक्साईज रद्द झाला पाहिजे’, अशा लिहिलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या. त्यामुळे ११ वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती शाहू टर्मिनन्समधून सुटणारी कोल्हापूर तिरुपती-हरिप्रिया एक्सप्रेस ही रेल्वे नियोजित वेळेत सुटली. रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनात राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, जिल्हाध्यक्ष अमोल ढणाल, उपाध्यक्ष केरबा खापणे, पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, सचिन देवरूखकर, संभाजी नाळे, राजाराम पाटील, अरुण पाटील, अमोल नागवेकर, मधुकर बुवा, विलास बावणे, मोहन माळी, सुनील म्हेतर, सुधाकर पाटील, महेश साजणीकर, महेश पोरे, राजकुमार शेटके, किरण गवाणकर, रमेश कारेकर, संजय पोतदार, रवींद्र पोतदार, नामदेव मांगले, विजय बांदिवडेकर, संजय मालंडकर, शशिकांत पाटील, आदी सदस्य व सराफ, सुवर्णकार, कारागीर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)