रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार जोमात पथक पोहोचले मुंबईत : एजंटांची पुन्हा चलती

By admin | Published: May 15, 2014 12:59 AM2014-05-15T00:59:29+5:302014-05-15T01:04:43+5:30

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्रीय रेल्वे सुरक्षा पथकाने चार-पाच दिवसांपूर्वी सांगली,

Railway ticket reached Kalam market Jorhat Pathak in Mumbai: Agents re-run | रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार जोमात पथक पोहोचले मुंबईत : एजंटांची पुन्हा चलती

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार जोमात पथक पोहोचले मुंबईत : एजंटांची पुन्हा चलती

Next

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्रीय रेल्वे सुरक्षा पथकाने चार-पाच दिवसांपूर्वी सांगली, मिरज, इचलकरंजी, रुकडी आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्ष तपासले. यावेळी तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दोन एजंटांसह चार ट्रॅव्हल्स एजन्सीवर कारवाई करीत ते माघारी परतले. पथक मुंबईत पोहोचताच पुन्हा तिकिटांचा काळाबाजार जोमाने सुरू झाला. आरक्षणासाठी नाव, ओळखपत्र, पत्ता, वय, आदी पुरावा लागत असतानाही काही रेल्वे कर्मचार्‍यांसह पोलिसांशी संगनमत करून तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या यंत्रणेने मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रेल्वेचे ‘तिकीटघर’ आपला अड्डाच बनविले आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईसह दिल्ली, तिरूपती, पुणे, सोलापूर, आदी मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचे बुकिंग हाउसफुल्ल आहे. अशा परिस्थितीत रेल्वे तिकिटांचे तत्काळ आरक्षण मिळविण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडत आहे. काही प्रवाशांनी दोन महिन्यांपूर्वी आरक्षण केले केल्याने बुकिंग हाउसफुल्ल आहे. त्यामुळे अनेक नागरिक तत्काळ तिकीट मिळविण्यासाठी पहाटेपासून तिकीट आरक्षण कक्षासमोर प्रतीक्षा करताना दिसतात. या तिकिटांना मागणी जास्त असल्याने तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटने मिरज ते कोल्हापूर मार्गावर आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. हे एजंट आरक्षण रांगेत उभे राहून तिकिटे काढतात आणि चढ्या दराने त्यांची विक्री करतात. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी रुकडी-मिरज रेल्वेस्थानकावर तिकीट रांगेत दुसर्‍याच्या नावे उभ्या असलेल्या गणेश पवार व राजेंद्र दरिबे या एजंटांना अटक केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच इचलकरंजी व कोल्हापूर रेल्वेस्थानकाची मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल मुख्यालयातील केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुबेर खान, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ढेंगे व त्यांच्या सात कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता इचलकरंजी येथील चार ट्रॅव्हल्स एजन्सीचे बुकिंग रजिस्टर संशयास्पद असल्याचे आढळून आले. या पथकाची चाहुल कोल्हापुरातील एजंटांना लागताच ते चार-पाच दिवस फिरकलेच नाहीत. त्यामुळे पथकाचा कोल्हापुरातील सापळा अयशस्वी ठरला. ते माघारी मुंबईला परतले. तोपर्यंत पुन्हा याठिकाणी तिकिटांचा काळाबाजार जोमाने सुरू झाला आहे. रेल्वे प्रशासनास यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी नियमानुसार आम्ही आरक्षण करीत असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ कोल्हापूर रेल्वेस्थानकावर आरक्षण तिकीट रांगेत उभ्या असलेल्या आठ ते दहा तरुणांची सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाल दिसून आल्याने मुंबईच्या पथकाने या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पाच तास त्यांना एस.आर.पी. पोलीस ठाण्याच्या एका खोलीत उभे केले होते. स्वत: एजंट नसतानाही स्वत:चे तसेच कुटुंबातील काही व्यक्तींचे आरक्षण करण्यासाठी हे तरुण उभे होते. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ अशी या तरुणांची अवस्था झाली होती.

Web Title: Railway ticket reached Kalam market Jorhat Pathak in Mumbai: Agents re-run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.