राज्यात रेल्वेत घातपाताची शक्यता, रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:46 PM2019-03-29T14:46:00+5:302019-03-29T14:48:28+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाडीमध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याचा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभाग यांना इतर गोपनीय यंत्रणेकडून मिळाला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. घातपाती कृत्यांच्या अनुषंगाने रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाडीमध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याचा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभाग यांना इतर गोपनीय यंत्रणेकडून मिळाला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. घातपाती कृत्यांच्या अनुषंगाने रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. प्रस्थापित मातब्बरांच्या राजकीय वर्चस्वासाठी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांकडून राज्यातील रेल्वे स्थानके लक्ष असल्याची गोपनिय माहिती गुप्तचर विभागाला आली आहे.
दोन दिवसापूर्वी कराड येथे कोयना एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविण्यात आली. या प्रकारामुळे राज्यातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. निवडणुकीच्या धामधुमीत रेल्वेमध्ये काही अनिष्ट व्यक्ती प्रवेश करून घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत.
विशेषत: रेल्वेची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची नियमित बॉम्बशोध पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. या परिसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करुन अंगझडती घेवून सोडले जात आहे. चौवीस तास याठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीसांच्या सुट्या रद्द
निवडणुकीच्या धामधुमीत विविध पक्षांच्या प्रचार संभा होत आहेत. निवडणुक शांततेत पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.