पाऊस आला, शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:35+5:302021-08-28T04:27:35+5:30

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात कडक उन्हाळा अनुभवणाऱ्या जिल्ह्यावर शुक्रवारी अचानकपणे पर्जन्यकृपा झाल्याने शेतकरी सुखावला आहे. होरपळणाऱ्या पिकांना जीवदान ...

The rain came, the farmer was relieved | पाऊस आला, शेतकरी सुखावला

पाऊस आला, शेतकरी सुखावला

Next

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात कडक उन्हाळा अनुभवणाऱ्या जिल्ह्यावर शुक्रवारी अचानकपणे पर्जन्यकृपा झाल्याने शेतकरी सुखावला आहे. होरपळणाऱ्या पिकांना जीवदान मिळाल्याने शिवारही आनंदले आहे. वादळी स्वरूपात का असेना; पण पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने उद्या, रविवारपासून पाऊस आठवडाभरासाठी सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी ही पावसाची उघडीप मात्र दिवस जातील तशी काळजी वाढविणारी ठरली. सध्या सोयाबीनच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असला तरी भुईमूग, भातासह अन्य कडधान्यांची पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. पाऊस नसल्याने फूलगळ आणि फळगळही सुरू आहे. जमिनी पूर्णपणे भेगाळल्या असून पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत पावसाची नितांत गरज आहे. गेल्या चार दिवसांपासून नुसते ढग भरून येतात; पण एक थेंबही पडत नसल्याने शेतकरी हबकला आहे.

शुक्रवारी सकाळीही असेच ढग भरून आले होते; पण तासाभरानंतर पुन्हा कडकडीत ऊन पडले. दुपारनंतर मात्र पुन्हा ढग दाटून आले आणि जवळपास तासभराहून अधिक काळ दमदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे पंधरा दिवसांपासून तहानलेल्या जमिनीही गार झाल्या. कोमेजणाऱ्या पिकांनाही जीवदान मिळाले.

चौकट

उन्हाच्या झळांपासून सुटका

दरम्यान, हा पाऊस कुठे पडला कुठे नाही असाच होता. कोल्हापूर शहरात तर दुपारी दोन किलोमीटरच्या अंतरावर एका ठिकाणी पाऊस पडत होता, तर दुसरीकडे कडकडीत ऊन होते. जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र अशीच परिस्थिती होती; पण ‘कुठे तरी पडला पण पडला एकदाचा’ म्हणत या पावसाचे सर्वांनीच स्वागत केले. पाऊस पडल्याने कडक उन्हाच्या झळांपासू्न सुटका झाली.

चौकट

रविवारपासून पाऊस

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात रविवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तसा अंदाजही व्यक्त केला आहे. हा सर्वदूर चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी कामाचे नियोजन करावे, असे अंदाजात म्हटले आहे.

Web Title: The rain came, the farmer was relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.