कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:39 PM2020-09-11T16:39:13+5:302020-09-11T16:40:27+5:30
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाने रोजच रतीब लावल्याने बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. भात, भूईमूग पिके काढणीस आल्याने हा पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक ठरत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाने रोजच रतीब लावल्याने बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. भात, भूईमूग पिके काढणीस आल्याने हा पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक ठरत आहे.
गुरूवारी रात्री अनेक ठिकाणी पुन्हा ढगफुटीसारखा पाऊस झाला. तास-दीड तास झालेल्या पावसाने पाणी पाणी केले होते. शुक्रवारी सकाळ पासून ढगाळ आणि कुंद वातावरणच राहिले. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, असेच दिवसभर वातावरण राहिले.
दुपारी तीन वाजल्यापासून कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनिटे पावसाने झोडपून काढले. शहरात पाणीच पाणी करून सोडले. सखल भागात पाणी तुंबले. तर जोरदार पावसाने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पाऊस लगेच थांबला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.