कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी वर्षा दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:04+5:302021-08-17T04:30:04+5:30

कोल्हापूर : ‘लस घ्या, कोरोनाला दूर ठेवा आणि आरोग्यासाठी धावा’ हा संदेश देत सोमवारी बिनखांबी गणेश मंदिर ते ...

Rain race for corona prevention vaccination | कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी वर्षा दौड

कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी वर्षा दौड

Next

कोल्हापूर : ‘लस घ्या, कोरोनाला दूर ठेवा आणि आरोग्यासाठी धावा’ हा संदेश देत सोमवारी बिनखांबी गणेश मंदिर ते कळंबा आय. टी. आय. या मार्गावर वर्षा दौड करण्यात आली. पाच किलोमीटरच्या दौडमध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

पेपर पिन ब्रँडिंग आणि आर्ट डिझाईन स्टुडिओचे इंद्रजित महाजन, न्यूट्री शील गुड प्रॉडक्टचे शील कोरगावकर, एक्वा प्लॅनेट एक्वारियम शॉपचे सागर महाजन यांच्या पुढाकारातून धोंडिराम चोपडे, नाना गवळी, राजेश पाटील यांच्या संयोजनातून दौडचे आयोजन केले होते. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आणि सर्वांनी लसीकरण करावे यासाठी कोल्हापुरात वर्षा दौडचे आयोजन करण्यात आले होते.

उद्योगपती विकी महाडिक यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौडची सुरुवात करण्यात आली. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांच्या हस्ते सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आली. प्रास्ताविक प्रा. एस. पी. चौगले यांनी केले. यावेळी पी. बी. नांदवडेकर, महिपती संकपाळ, रावसाहेब सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र रासकर आदी उपस्थित हाेते.

फाेटो ओळी : ‘लस घ्या, कोरोनाला दूर ठेवा आणि आरोग्यासाठी धावा’ हा संदेश देत सोमवारी बिनखांबी गणेश मंदिर ते कळंबा आय. टी. आय. या मार्गावर वर्षा दौड करण्यात आली. (फोटो-१६०८२०२१-कोल-वर्षा)

Web Title: Rain race for corona prevention vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.