पावसाची उसंत, तरीही पंचगंगेच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:45 PM2019-07-29T15:45:45+5:302019-07-29T15:47:50+5:30
कोल्हापूर जिल्'ासह शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभरात एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याला फुग आली आहे. ३१ बंधारे पाण्याखाली असून या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्'ासह शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभरात एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याला फुग आली आहे. ३१ बंधारे पाण्याखाली असून या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
दोन दिवसांच्या तुलनेत जिल्'ात पावसाचा जोर काहीसा ओसरला. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी त्यांत तितकासा जोर नाही. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळ्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्'ात ४२३.५४ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ७९.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रांतही जोरदार पाऊस सुरू असून पाणीपातळीत वाढ होत आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४००, तर कासारीतून ६००, कडवीतून १६० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरणातून ३०० घनफूट विसर्ग सुरू असल्याने कुंभी, भोगावतीच्या पाण्याला फुग आहे.
सकाळी आठ वाजता पंचगंगेची पाणीपातळी ३२.१० फूट, तर सायंकाळी सहा वाजता ३३.८ फुटांवर राहिली. जिल्'ातील विविध नद्यांवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पावणेचार लाखांचे नुकसान
जिल्'ात पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. अकरा सार्वजनिक मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख ६७ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
वारणा धरण ७५ टक्के भरले
गेले तीन-चार दिवस धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी ८५ टक्के , तुळशी ६७ टक्के, तर वारणा ७५ टक्के भरले आहे. दूधगंगा अद्याप ५२ टक्क्यांवरच आहे.