कोल्हापूर जिल्ह्यात २०२१ पेक्षा पाऊस कमी; पण पडझड अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:54 PM2024-09-16T13:54:51+5:302024-09-16T13:55:03+5:30

साडेतीन महिन्यांत ४,१५८ मालमत्ता कोसळल्या : पडझडीत १४.१५ कोटींचे नुकसान; पण भरपाई कमी

Rainfall in Kolhapur district less than 2021; But the fall is more | कोल्हापूर जिल्ह्यात २०२१ पेक्षा पाऊस कमी; पण पडझड अधिक

कोल्हापूर जिल्ह्यात २०२१ पेक्षा पाऊस कमी; पण पडझड अधिक

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्ह्यात २०२१ मध्ये महापुराचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. महापुराने सगळीकडे हाहाकार माजला होता; पण त्या तुलनेत यंदा पाऊस कमी होऊनही नुकसान मात्र अधिक झाले आहे. त्यावेळी खासगी व सार्वजनिक अशा २,६८५ मालमत्तांची पडझड झाली होती. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ४,१५८ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये १४ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले असले तरी आतापर्यंत भरपाई खूप कमी लोकांना मिळाली आहे.

अलीकडील तीन वर्षांत २०१९ व २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने कहर केला होता. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड त्याने मोडले आहेत. १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात सरासरी १५२१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. जूनमध्ये उघडझाप राहिली मात्र, जुलैमध्ये जोर पकडला. ऑगस्टमध्ये उघडझाप तर कधी जोरदार पाऊस कोसळला. सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिली. अधूनमधून पाऊस राहिला असला तरी २०२१च्या तुलनेत यंदा पाऊस कमीच आहे.

मागील महापुराइतकी तीव्रता नसली तरी पूर आला. विशेष म्हणजे, तब्बल दहा दिवस पुराचे पाणी शिवारात राहिले. त्यामुळे पिकांचे नुकसानही खूप झाले आहे. त्याचबरोबर मालमत्तांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत खासगी व सार्वजनिक अशा ४,१५८ मालमत्तांची पडझड झाली आहे. २०२१च्या तुलनेत जवळपास १,४७३ने पडझड वाढली आहे. शासनाच्या अंदाजानुसार या सर्व मालमत्तांची पडझड होऊन सुमारे १४ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले आहे.

पडझडीचा आकडा मोठा; पण भरपाईचा छोटा

पडझडीचा आकडा मोठा असला तरी शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईचा आकडा खूपच कमी असतो. यंदा ४,१५८ मालमत्तांची पडझड झाली असली तरी त्यापैकी १,६३२ मालमत्तांच्या पडझडीला मान्यता दिली आहे.

चार वर्षांत १८७ जनावरे दगावली

गेल्या चार वर्षांत महापुरासह पडझडीमध्ये १८७ दुभती जनावरे दगावली; पण शासनाच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या खूपच कमी असून, जेमतेम १७ पशुपालकांना मदत देण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांत झालेली पडझड अशी

मान्सून वर्ष - पडझड - जनावरे मृत्युमुखी
२०२१  -  २६८५  - १२३
२०२२ -  ९८४ - १४
२०२३  - ६८३ - १७
२०२४  - ४१५८ - ३३

Web Title: Rainfall in Kolhapur district less than 2021; But the fall is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.