पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 06:42 PM2021-07-17T18:42:41+5:302021-07-17T18:44:04+5:30
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. कोल्हापूर शहरात तर तुरळक सरी वगळता दिवसभर ऊन राहिले. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी झाली आहे. राधानगरी धरणातून मात्र प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. कोल्हापूर शहरात तर तुरळक सरी वगळता दिवसभर ऊन राहिले. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी झाली आहे. राधानगरी धरणातून मात्र प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. शुक्रवारी अधूनमधून सरी कोसळत होत्या, मात्र शनिवारी काहीसी उघडीप राहिली. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यात सरी कोसळल्या. मात्र, उर्वरित तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या.
धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला असला तरी धरणातील विसर्ग कायम आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १३५०, वारणा ११०५ तर दूधगंगेतून १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग सुरू असला तरी नद्यांची पातळीत घट होत आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगेची पातळी तीन फुटांनी कमी झाली. अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.