राधानगरी तालुक्यात पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:29+5:302021-07-03T04:16:29+5:30

जून महिन्यात दरवर्षी इतकाच पाऊस झाला. मात्र त्यातील ९० टक्के पाऊस १५ ते १९ जूनच्या दरम्यान झाला आहे. यावर्षी ...

Rainfall in Radhanagari taluka | राधानगरी तालुक्यात पावसाची दडी

राधानगरी तालुक्यात पावसाची दडी

googlenewsNext

जून महिन्यात दरवर्षी इतकाच पाऊस झाला. मात्र त्यातील ९० टक्के पाऊस १५ ते १९ जूनच्या दरम्यान झाला आहे.

यावर्षी लवकर पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र तो खोटा ठरवत १२ जूननंतर तुरळक व १५ जूनपासून धो-धो पावसाला सुरुवात झाली. या चार-पाच दिवसांत झालेल्या पावसाने नद्यांना पूर आले. अनेक बंधारे पाण्याखाली गेले, काही मार्गावरील वाहतूक बंद पडली. या पावसामुळे पिकांच्या उगवणीवर परिणाम झाला. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला.

जून महिन्यात तालुक्यातील तिन्ही मोठ्या धरणाच्या ठिकाणी साधारण गेल्यावर्षीच्या एवढाच पाऊस झाला आहे. काळमावाडी येथे ३० जूनपर्यंत ७९५ मिमी पाऊस झाला आहे. धरणात 9.73 टीमसी (38 टक्के) पाणी आहे. गेल्यावर्षी याच दिवसांपर्यंत 814 मिमी पाऊस झाला होता. 10.25 टीमसी (39.48 टक्के) पाणीसाठा होता. राधानगरी धरणस्थळी ९८४ मिमी पावसाची नोंद झाली असून २.३५ टीएमसी पाणी साठा आहे. मागील वर्षी ९९४ मिमी पाऊस होवून २.७३ टीएमसी पाणीसाठा होता. धामोड येथील तुळसी धरणस्थळी ९७८ मिमी पाऊस झाला असून 1.76 टीमसी पाणी आहे. गेल्यावर्षी 675 मिमी पाऊस होऊन 1.48 टीमसी पाणी साठले होते.

Web Title: Rainfall in Radhanagari taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.