बुबनाळ येथे पावसामुळे शेतजमिनी कातरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:23+5:302021-06-24T04:17:23+5:30

बुबनाळ : मुसळधार पडलेल्या पावसामुळे बुबनाळ (ता. शिरोळ) येथील शेतक-यांचे पंधरा गुंठे शेतजमीन वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले ...

Rains in Bubnal have eroded farmland | बुबनाळ येथे पावसामुळे शेतजमिनी कातरल्या

बुबनाळ येथे पावसामुळे शेतजमिनी कातरल्या

Next

बुबनाळ : मुसळधार पडलेल्या पावसामुळे बुबनाळ (ता. शिरोळ) येथील शेतक-यांचे पंधरा गुंठे शेतजमीन वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महालक्ष्मी बहुउद्देशीय क्षारपड संस्थेच्या गेलेल्या पाईपलाईनमुळे नुकसान झाले असून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बुबनाळ येथील श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय क्षारपड संस्थेची सुमारे पन्नास एकर जमीन सुधारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी क्षारयुक्त पाणी ओढ्यालगतच्या अजित कारदगे, जगदीश कारदगे, तातोबा कारदगे या शेतक-यांच्या जमिनीमधून जेसीबीच्या साहाय्याने खुदाई करून सोडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातून आलेले पाणी थेट शेतात घुसून दहा ते पंधरा गुंठे क्षेत्र कातरले आहे. त्यात शेतातील पाच फूट माती वाहून गेली आहे. यामध्ये शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. क्षारपड संस्थेच्या पाईपलाईन खुदाईमुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास जमीन ओढ्यात ढासळण्याची शक्यता आहे. याबाबत क्षारपड संस्थेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अजित कारदगे, जगदीश कारदगे, तातोबा कारदगे यांनी केली आहे.

---------------------------------

चौकट - भविष्यातही धोका कायम

औरवाड व बुबनाळ दोन्ही गावे मिळून क्षारपड योजना होत असताना एका नेतेगिरी करणा-या व्यक्तीच्या मी पणामुळे दोन संस्था झाल्या आणि याचा फटका जमीन कातरून सर्वसामान्य शेतक-याला बसला आहे. या क्षारपड योजनेमुळे भविष्यातही ओढ्यालगत असणा-या शेतक-यांच्या जमिनी कातरून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

फोटो - २३०६२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - बुबनाळ (ता. शिरोळ) येथे पावसामुळे क्षारपड योजनेची पाईपलाईन गेलेली शेतजमीन कातरली आहे. (छाया - रमेश सुतार, बुबनाळ)

Web Title: Rains in Bubnal have eroded farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.