उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना किंचितसा दिलासा, शहर परिसरात वळीव पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:31 PM2022-04-28T18:31:48+5:302022-04-28T18:37:06+5:30

कोल्हापूर : गेली आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. अंगाची लाहीलाही होत असतानाच आज सायंकाळच्या सुमारास ...

rains in Kolhapur city area | उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना किंचितसा दिलासा, शहर परिसरात वळीव पावसाची हजेरी

छाया : आदित्य वेल्हाळ

Next

कोल्हापूर: गेली आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. अंगाची लाहीलाही होत असतानाच आज सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा पसरला. जोरदार वाऱ्यासह काही वेळातच पाऊस सुरु झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. केवळ अर्धा तासच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले.

आज, दिवसभरात उन्हाचा पारा ४० अंशावर जाऊन पोहचला होता. उन्हाने नागरिक हैराण झाले होते. यातच सायंकाळनंतर वातावरण अचानक बदलले. जोरदार वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठले. यानंतर सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटातच सर्वत्र पाणीच पाणी झाले.

आजपासून पुन्हा उष्णतेची लाट

आज, गुरुवारी पावसाने हजेरी लावून सुखद धक्का दिला असलातरी उद्या, शुक्रवारपासून पुढील आठवडाभर तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. पारा ३९ अंशाच्यावरच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Web Title: rains in Kolhapur city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.