रिमझिम पावसात, चांगभलंचा गजर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 12:41 AM2016-08-23T00:41:13+5:302016-08-23T00:55:05+5:30

जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा उत्साहात

Rainy rain, fluttering alarm ..! | रिमझिम पावसात, चांगभलंचा गजर..!

रिमझिम पावसात, चांगभलंचा गजर..!

Next

जोतिबा: रिमझिम पाऊस, गुलालाची उधळण व ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ चा जयघोष करीत श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाचा नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त या नगरप्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकांतील लाखो भाविकांनी हजेरी लावली.
वीणा,टाळ, मृदंग तसेच भजन-कीर्तनाच्या गजरात जोतिबा डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी १५ किलोमीटरअंतर अनवाणी चालत चारधाम यात्रेचे पुण्य मिळवून देणारी नगरदिंडी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांनी पूर्ण केली.या नगरदिंडीत लहान मुलांसहमहिला व वृद्धांनी सहभाग घेतला. ‘चाला आरोग्यासाठी’ हा संदेश देत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
श्रीजोतिबा मंदिरात अभिषेक,आरती करून सकाळी नऊ वाजता नगरदिंडीस प्रारंभ झाला. दक्षिण दरवाजातून दिंडी गायमुख तीर्थाकडे मार्गस्थ झाली.अग्रभागी असणाऱ्यावीणाधारी, डवरी,पुजारी, टाळ-मृदुंग, भगव्या पताका या लवाजम्यासह दिंडीप्रथम बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिरात दाखल झाली.या ठिकाणी आरती करण्यात आली.गायमुख तीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी धडस मिटके मळा येथील चोपडाई देवी तीर्थाकडे मार्गस्थ झाली. दिंडी मार्गावर ग्रामपंचायतीने पाणी व्यवस्था केली होती, तर कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता.
सहज सेवा ट्रस्टच्या वतीने खिचडी व केळी वाटप केली. १५ वर्षांपासूनहीखिचडी वाटप केली जात आहे.मिटके व धडस परिवारतर्फे चहा वाटप करण्यात आला.दिंडीपुढे नंदी आंबा या ठिकाणी आली असता केळी वाटप केली. भैरवनाथ,सारकाळ मार्गे दिंडी दुपारीगिरोली गावात आली. गिरोली गावात येताच दिंडीतील सहभागी महिलांनी झिम्मा-फुगडीचा डाव मांडला.दिंडीतील पुरुषांनीही कबड्डी,दहीहंडीचे मनोरे रचले.हरिनामाचा गजर करीत दिंडी पुढे सरकत होती. दिंडीमध्ये लहानथोरांचा सहभाग मोठा होता.दुपारी चार वाजता ही दिंडी एकाच दगडावर असणाऱ्या बारा लिंग मंदिरात दाखल झाली.या ठिकाणी सातार्डेकर भावकीमार्फत चहा वाटप करण्यात आला. पोहाळे पांडव लेणी येथील औंढ्या नागनाथाच्या दर्शनानंतर सायंकाळी पाचवाजता ही दिंडी परत गायमुख तीर्थ या ठिकाणी आली. सायंकाळी सहा वाजता गायमुख मार्गे दिंडी जोतिबा मंदिरात दाखल झाली.‘चांगभलं’चा गजर करीत भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले.सायंकाळी ६.३० वाजता ही दिंडी श्री यमाईदेवी मंदिरात दाखल होताच आरती करून सुंठवडा वाटप करण्यात आला. सुंठवडा वाटपाने नगर प्रदक्षिणेची सांगता झाली.


महिलांचा झिम्मा-फुगडीचा डाव चांगलाच रंगला, तर पुरुषांनी कबड्डीची चुणुक दाखविली तसेच दहीहंडीचे मनोरे रचले.जोतिबाची पारंपरिक गीते, भजन, हरिनामाचा गजर करीत दिंडी पुढे सरकत होती.
दिंडीमार्गात ठिकठिकाणी केळी,शाबू,चहा,दूध, राजगिरा लाडू व उपवासाचे पदार्थ वाटले जात होते.
‘चाला आरोग्यासाठी’ हा संदेश देत मोठ्या संख्येने युवक , लहान मुले व वृद्ध महिलांसह भाविक सहभागी झालेहोते.

Web Title: Rainy rain, fluttering alarm ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.